Thursday, January 16, 2025

चोर लिफ्ट ने सैफच्या घरात आला; मात्र...लिफ्ट चा एक्सेस फक्त घरच्या लोकांना माहीत होता, मग चोराला अक्सीस कसा मिळाला; पोलिसांचा त्या ड्रीष्टीने तपास सुरू :

वेध माझा ऑनलाइन
अभिनेता सैफ अली खानच्या घरात आलेला चोर हा इमारतीतील प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून आत आला असल्याचं समोर आलं आहे. प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस हा फक्त सैफच्या घरातील व्यक्तींनाच माहीत आहे. अॅक्सेसशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. त्यामुळे घरातीलच व्यक्तीने हा हल्ला केला की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरी चोराने प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. 

सैफ अली खानच्या इमारतीमध्ये दोन लिफ्ट असल्याची माहिती आहे. एक कॉमन लिफ्ट आहे तर एक सैफच्या परिवारासाठीची प्रायव्हेट लिफ्ट आहे. प्रायव्हेट लिफ्टमधून थेट सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळतो.  पण या प्रायव्हेट लिफ्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅक्सेस कार्डची गरज असते. त्याशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. 
चोराने या प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून सैफच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरीनीशी त्याचा सामना झाला. या प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस चोराला कसा मिळाला हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे चोराला घरातीलच कोणत्या व्यक्तीने मदत केली की काय असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Wednesday, January 15, 2025

वाल्मिक कराड चे सिमकार्ड विदेशात रजिस्टर !धक्कादायक माहिती आली समोर;

वेध माझा ऑनलाइन
सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांच खून केला आहे. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मीक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे, असे मुद्दे एसआयटीने न्यायालयात मांडले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

 सिमकार्ड अमेरिकेत रजिस्टर झाले!...

वाल्मिक कराडचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिमकार्डवरुन काही लोकांना फोन केले गेले, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळे हे फोन का केले गेले, कोणती कारणं होती, याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे.

सुप्रिया सुळे यांचा फोन,...म्हणाल्या । बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता...काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा,

वेध माझा ऑनलाइन
सैफ अली खानवर रात्री अडीच वाजता हल्ला झाल्याचा प्रकार घडला या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.
सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले. हा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. मात्र, सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले

सैफ अली खान च्या मानेवर 10 सेमी ची जखम ;

वेध माझा ऑनलाइन
वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सैफ आली खानवर काल रात्री मध्यरात्री चाकू हल्ला झाला. अज्ञाता व्यक्तीनं चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या व्यक्तीनं तब्बल दोन ते तीनवेळा सैफवर वार केल्याची माहिती मिळत आहे. चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या व्यक्तीनं दोन ते तीनवेळा वार केल्याची माहिती मिळत आहे. 

सैफ अली खान आणि करिना कपूर वांद्रे येथे राहतात. याच घरात रात्री अडीचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली. धक्कादायक बाब म्हणजे, सैफची लहान मुलं ज्या रुममध्ये झोपलेली, त्याच रुमच्या बाल्कनीमधून त्या अज्ञात व्यक्तीनं सैफच्या रुममध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली. सैफ अली खान तातडीनं उठून रुममधून बाहेर येत होता. त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने-सामने आले. त्यानंतर त्या व्यक्तीनं हातातल्या धारदार शस्त्रानं सैफवर वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. सैफच्या मानेवर तब्बल 10 सेमीची जखम झाली आहे. सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं वार केले. सैफच्या पाठीत त्या व्यक्तीनं धारदार शस्त्र खुपसलं. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं. पाठीत घुपसलेलं शस्त्र धारदार आणि टोकेरी होतं. सैफच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफ अली खानवर शस्त्राने हल्ला ; पोलिसांना महिलेवर संशय ; कोण आहे ही महिला ?

वेध माझा ऑनलाइन
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2.30 (16 डिसेंबर) एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे.  घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला.

खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली; एसआयटीचा न्यायालयात दावा ; बातमी;

वेध माझा ऑनलाइन
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येमागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात माहिती देताना सांगितले. त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला 7 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. वारंवार अवादा कंपनीकडे आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होते, पण कंपनीने दिली नाही. त्यावेळी, संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने आज न्यायालयात 7 दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.

धंनजय मुंडे अचानक मुंबईहून परळीला का रवाना झाले ;मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार मागणी;

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. 

वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वाल्मिक कराडने रुग्णालयाबाहेर येताच रोहित कुठंय... असा प्रश्न केला ; हा रोहित आहेतरी कोण?

वेध माझा ऑनलाइन
खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला. केज सत्र न्यायालयाने काल (14 जाने.) वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात  आले. 

न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराडची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रुग्णालयात त्याची ईसीजी देखील करण्यात आली. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वाल्मिक कराडला पुन्हा बीड कारागृहात नेण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती. तसेच पोलीस आणि माध्यमांचा गराडा देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयाबाहेर होता. यावेळी वाल्मिक कराड रुग्णालयाबाहेर येताच रोहित कुठंय?, असा प्रश्न केला. साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठेय, असं वाल्मिक कराडने विचारले. त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण आहे?, याची चर्चा सध्या रंगली आहे.

वाल्मिक कराडला कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर राडा ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आरोपी कराडला कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली, तर काहींनी वाल्मिक कराडला विरोधाही घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या अॅड. हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं, असं म्हटलं. तर, काही वकिलांनीही संविधानाचा दाखला देत वाल्मिक कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यामुळे, बीडच्या कोर्टाबाहेरच राडा पाहायला मिळाला. 
बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर एसआयटी पथकाने वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कोर्टाबाहेर वकिलांचेच दोन गट दिसून आले, त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली. तर, एका वकिलाने वाल्मिक कराड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचं म्हणत त्यांचे समर्थन केले, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलं. त्यानंतर, पोलीस व इतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.

लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांनी तडकाफडकी दिले राजीनामे; काय आहे बातमी ?

 वेध माझा ऑनलाइन
लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात यांनी आज ऐन संक्रांतीच्या सणादिवशीच नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिला, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे दिल्याने लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे
लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी सुरुवातीला प्रभाग सातमधून विजयी झालेल्या मधुमती गालिंदे-पलंगे यांना नगराध्यक्षपदाची, तर प्रभाग नऊमधून विजयी झालेले शिवाजीराव शेळके- पाटील यांना उपाध्‍यक्षपदाची संधी दिली होती. त्याच वेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सव्वा सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्याचा ठराव करण्यात आला होता.
त्या ठरावानुसार नगराध्यक्षा सीमा खरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या वेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर व शिवाजीराव शेळके- पाटील, नगरसेवक सचिन शेळके, गणिभाई कच्छी, सागर शेळके, भरत बोडरे, तसेच अॅड. गणेश शेळके, ॲड. गजेंद्र मुसळे, सागर गालिंदे, असगरभाई इनामदार आदी उपस्थित होते.
लोणंद नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली, तर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी तीन तर एका जागेवर अपक्ष विजयी झाले होते. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या मधुमती गालिंदे, शिवाजीराव शेळके- पाटील यांना, त्‍यानंतर सीमा खरात व रवींद्र क्षीरसागर यांना संधी मिळाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.
काँग्रेसच्या दीपाली नीलेश शेळके व प्रवीण व्हावळ यांनीही महाविकास आघाडीला तिलांजली देत महायुतीचे काम पसंत केले, तर भाजपच्या दीपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे व ज्योती डोणीकर यांनी जागेवरच ठाम राहून महायुतीचा धर्म पाळत पक्षादेशानुसार आमदार मकरंद पाटील यांचेच काम केले, तसेच अपक्ष नगरसेविका राजश्री शेळके यांनीही आमदार पाटील यांचेच काम केल्‍याने काँग्रेसच्या आसिया बागवान या एकमेव एक नगरसेविका विरोधी बाकावर राहिल्या आहेत.

वाल्मिक कराडला धक्का ; वाईन शॉप च लायसन रद्द ;

वेध माझा ऑनलाइन
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर सीआयडीच्या विशेष पथकाकडे त्याचा ताबा देण्यात आला असून कोणालाही दयामाया दाखवू नका, याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले . त्यानंतर, आरोपी वाल्मिक करडावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असून वाल्मिकला 24 तासांत तिसरा धक्का देण्यात आलाय. वाल्मिक कराडच्या केजमधील वाईन शॉपसाठी देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलंय. दरम्यान, खंडणीप्रकरणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपी वाल्मिकला सीआयडी पोलिसांना मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.

एसआयटीने वाल्मिक कराडच्या गुन्ह्याचा पाढा वाचला ; वाल्मिक अडचणीत ;

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला.


9 डिसेंबरला केज तालुक्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. 3 ते 3.15 दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते, अशी माहिती एसआयटी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती असल्याचेही अनिल गुजर यांनी सांगितले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड  या तिघांमध्ये 9 डिसेंबरला काय तपास झाला, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याची 10 दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली आहे. यावर आता न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 गुन्ह्यांची यादी न्यायालयात सादर
वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. MCOCA कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटीकडून देण्यात आला. इतर आरोपीविरोधही दाखल गुन्ह्यांची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा धक्कादायक दावा देखील एसआयटीने केला आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंडस मांडली. दरम्यान कोर्टातला युक्तिवाद हा ऑन कॅमेरा सुरु आहे. कोर्टरूममध्ये केवळ दोन्ही पक्षाचे वकील, आरोपी, तपासअधिकारी हेच उपस्थित आहेत.

अल्पवयीन मुलांना गाडी घेऊन देऊ नका ; पालकांवर गुन्हा दाखल होतो ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
१६ वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालवण्यास देऊ नये याची कायद्यात तरतूद आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार १८ वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालवता येत नाही; परंतु बरेच पालक हौसेखातर मुलांच्या हातात गाडीची चावी देऊन कौतुक केले जात आहे. अशा कौतुक करत अल्पवयीन मुलांना दुचाकी चारचाकी गाडी चालवण्यास देणाऱ्या पालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या वर्षभरात सातारा जिल्ह्यामध्ये चार पालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे

Tuesday, January 14, 2025

कराडच्या माजी नगराध्यक्षा उमा हिंगमीरे यांच्या घरात चोरी ; तक्रार दाखल

वेध माझा ऑनलाइन
कराड येथील माजी नगराध्यक्षांच्या घरात भर दुपारी कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. मार्केट यार्ड परिसरात माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे यांच्या घरात सोमवारी दुपारी चोरी झालेली घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. उदय हिंगमिरे यांनी याबाबत शहर पोलिसांत फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सोमवारी सकाळी श्री. हिंगमिरे त्यांच्या ऑफिसला गेले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे याही नोकरीच्या ठिकाणी गेल्या. घराबाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास उमा हिंगमिरे घरी परतल्या. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उदय हिंगमिरे घरी आले. त्यानंतर रात्री जेवण करून झोपी गेले मंगळवारी सकाळी उमा हिंगमिरे यांना संक्रांतीनिमित्त परिधान करण्यासाठी दागिने हवे होते, त्यामुळे त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता, कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती पती उदय हिंगमिरे यांना दिली. दोघांनी कपाटात पाहिले असता, कपाटातील ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे मंगळसूत्र, १ लाख २० हजार रुपये किमतीचे २ तोळ्याचे नेकलेस आणि ६० हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाच्या बांगड्या चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Monday, January 13, 2025

गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील विविध ठिकाणच्या विकासकामांचा शुभारंभ ;

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष गटनेते व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मा.राजेंद्रसिह यादव यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन कराड शहरातील विविध विकास कामांसाठी मंजुर झालेल्या निधीमधुन कराड शहरातील विविध ठिकाणच्या विकासकामांचा शुभारंभ आज मा.राजेंद्रसिह यादव यांच्या नेतृत्वाखाली धुमधडाक्यात संपन्न झाला.

कराड शहरातील शनिवार पेठ चिगळे सर्जिकल ते श्रीराम हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण,डाॅ.सुहास पाटील ते यश एम्पायर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण,महाराष्र्ट ट्रान्सपोर्ट ते शिवाप्पा खांडेकर घरापर्यंत रस्ता काॅक्रिटीकरण,वाखाण भागातील मुख्य रस्त्यापासुन दक्षिणेकडे महापुरे यांच्या घरापर्यत काॅक्रिटीकरण या कामांचा शुभारंभ करण्यात आला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्या-त्या परिसरातील ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते ही कामे सुरु करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हूलवान,निशांत ढेकळे,ओमकार मुळे,किरण पाटील, गजेंद्र कांबळे,विनोद भोसले,विजयसिंह यादव भाऊ सुधीर एकांडेकाका,नुरुल मुल्ला,राहुल खराडे,सचिन पाटील,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने तसेच येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते मा श्री राजेंद्रसिंह  यादव (बाबा) यांच्या पाठपुराव्यामुळे कराड शहरात होत असलेल्या विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजुर करुन आणुन विकास कामांचा शुभारंभही होत आहे कराड शहरातील नागरिक यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा व यशवंत विकास आघाडीला धन्यवाद देत आहेत.

Saturday, January 11, 2025

कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट: परप्रांतीय मजुराचा मृत्यू;

वेध माझा ऑनलाईन।
केमिकलचे बॅरेल कापत असताना भीषण स्फोट होऊन एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये घडली आहे. यामध्ये एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. स्फोटामुळे तासवडे एमआयडीसीचा परिसर हादरून गेला.

बिकेश कुमार रंजन (वय 25, मूळ रा. बिहार) असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तासवडे एमआयडीसी मध्ये सौरभ श्रीकांत कुलकर्णी यांची डिप्स बायोटिक नावाची जनावरांचे औषध बनवणारी कंपनी आहे.
या कंपनीला लागूनच त्यांची दुसरी कंपनी असून त्या ठिकाणी औषधाच्या गोळ्या ठेवण्यासाठी प्लास्टिक बरण्या तयार केल्या जात होत्या. या कंपनीच्या लोखंडी गेटचे काम सातारा येथील राणा यादव या ठेकेदारास दिले होते. त्यांनी गेटच्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी बिकेश कुमार आणि एका मजुरास सांगितले होते.
तेथेच डीप्स बायोटेक कंपनीचे बांधकाम सुरू असून पाणी साठवण्यासाठी बॅरेलची आवश्यकता होती. त्यामुळे कंपनीतील कामगाराने केमिकल कंपनीतून पत्र्याचा बॅरेल आणून तो बिकेश कुमारकडे कापण्यासाठी दिला होता. बिकेशकुमार ग्राइंडरने हे बॅरेल कापत होता. मात्र बॅरेलमध्ये शिल्लक असलेल्या केमिकलमुळे गॅस तयार झाला आणि अचानक मोठा आवाज होत बॅरेलचा स्फोट झाला. या स्फोटात बिकेश कुमार बाजूला फेकला गेला. आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या सोबत काम करत असलेल्या कामगाराने बिकेश कुमारला उपचाराकरिता कराड येथे हलवले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.



जरांगे-पाटील धंनजय मुंडेंना म्हणाले...तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आजा धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंस सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक आमदार स्थानिक लोकप्रतिनीधींनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका मांडली. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली. तर, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. या मोर्चात सर्वात शेवटी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर  जोरदार हल्लाबोल केला. 
धनंजय मुंडेंबाबत जरांगे म्हणाले
मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत गृहमंत्री व धनंजय मुंडेना लक्ष्य केलं. धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो, तुझ्या गुंडाना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. दरम्यान, बीड सरपंच हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्वच आरोपींवर आज पोलीस प्रशासनाकडून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध आज मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दारू होणार महाग ; राज्य सरकार लवकरच घेणार निर्णय?

वेध माझा ऑनलाइन।
सध्या राज्य सरकारचा महसूल विभाग कोणकोणत्या विभागामधून वाढीव महसूल मिळू शकतो हे तपासात आहे. आणि आपल्याला माहितीच असेल की मद्य व्यवसायामधून सरकारला मोठा महसूल मिळत असतो. म्हणूनच सरकार दारूवरील कर वाढवण्याचा विचार करत आहे महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यामुळे कर आणि शुल्क मध्ये वाढ केली तर मध्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार विशेष म्हणजे महसूल विभागाच्या वतीने दारू वरील करवाडी संदर्भात सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे दोन महिन्यात ही समिती राज्य सरकारला काही सूचना आणि निर्देश करणार आहे आणि त्या माध्यमातून महसूल वाढीसाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दल ही समिती सरकारला सूचित करणार आहे.

मद्य व्यवसायातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी सरकारने गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठित केली आहे इतर राज्यातील मध्य निर्मिती धोरण परवाने उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास ही समिती करणार आहे त्यानंतर ही समिती दोन महिन्यानंतर राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल आणि मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर मोठी टीका केली होती राज्य सरकारने आता हा शासन निर्णय काढून समिती स्थापन केली आहे.

धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येला गावातच थांबणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील धामोरी गावात भुताची अफवा पसरल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते गावकऱ्याचं प्रबोधन करणार आहेत. अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येला गावातच थांबणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील धामोरी ते सिन्नर तालुक्यातील शिरवाडे रस्त्यावरील नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले. भुताने त्या चालकाला मारहाण केली अशा आशयाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ एडिट केल्याचं निरीक्षणाअंती स्पष्ट झालं. या व्हायरल घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतली असून जगात भूत अस्तित्वात नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये अस आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावसेच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार असून नागरिकांच्या मनातील भीती घालवण्याचे प्रयत्न करणार आहेत. ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये अस आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि धामोरी गावच्या पोलिस पाटील संगिता ताजणे यांनी केलं आहे.

ठाकरे गटाची महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा ; शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत म्हणाले...त्यांचं काय चाललंय हे राज्यातील मतदारांना कळेना झालंय ;

वेध माझा ऑनलाईन
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक मोठी घोषणा केली. राजकीय वर्तुळात लगेच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली आहे. ठाकरे गटाकडून ही घोषणा झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही” असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले.

“2019 ला जनमताचा कौल मिळालेला असताना काँग्रेससोबत जाणं. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणं. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. त्या काँग्रेसचा प्रचार केला. भाषणात हिंदूह्दय सम्राट शब्द न वापरणं, याचे सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल” असं उदय सामंत म्हणाले.
ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, “योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहित. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल. म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील” अपेक्षित यश मिळेल का? ’15 वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही’ असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं. “पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल, तर त्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचं प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकरणात टिकणार कसे?” असं उदय सामंत म्हणाले
उदय सामंत म्हणाले की, काल परवाची त्यांची भूमिका आणि आजची भूमिका यातून दिसतय प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो”

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा ; काय म्हणाले संजय राऊत?

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांनतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: त्याबद्दलची घोषणा केली आहे
संजय राऊत काय म्हणाले?
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.

Friday, January 10, 2025

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराडात अटक;चोरट्यास कार्वे नाक्यावर पकडले

वेध माझा ऑनलाईन
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील घरफोडी प्रकरणातील
आरोपीस वडुज पोलिस ठाण्यातील पोलीसांनी आज अटक केली. कराड येथील कार्वे नाका येथे पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले.

इब्राहीम शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडुन आरोपीने आतमध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच दि. १५ रोजी दुपारी तडवळे येथील नवनाथ मूरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला.
कपाटातील ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरुननेल्याने अज्ञात चोरट्यां विरूध्द वडुज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक आणि गोपणीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हाआरोपी इब्राहीम अबास अली शेख याने केले असल्याची माहिती प्राप्त झाली. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने कराड, कडेगाव याठिकाणी सतत 3 दिवस अहोरात्र सध्या वेशातील संशयीत इब्राहीम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त करुन सदरचा आरोपी हा त्याचे मोटार सायकलवरुन त्याचे मूळ गावी विजापूर राज्य – कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाली.
त्याचा कराड येथील कार्वे नाका परिसरात पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून सखोल  विचारपूस केली. त्यानंतर त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यास अटक करुन चोरीस गेलेले मणी मंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याची बोरमाळ, कानातील सोन्याचे झूमके व वेल, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम आणि सोन्याची बोरमाळ, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम असा गुन्हयातीलएकूण ९ तोळे सोन्याचा ऐवज व ७०००/ – रोख रक्कम असा दोन्ही गुन्हयातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अजितदादा म्हणाले/ माझ्या विरोधात सर्व खानदान प्रचारात उतरले होते मात्र बारामती माझ्या पाठिशी राहिली ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात बारामतीचे महत्व आहे. वर्षनुवर्ष पवार कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघावर पवार कुटुंबामध्येच वर्चस्वाची लढाई सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बारामतीकर कोणासोबत आहे? याचे उत्तर लोकसभेला वेगळे आणि विधानसभेला वेगळे मिळाले. आता अजित पवार यांनी बारामती आपल्या पाठिशी असल्याचा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेमुळे मी म्हणणाऱ्यांना घरी बसावे लागले. राज्यात आजपर्यंत सर्वात जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत.

  अजितदादा म्हणाले
पुणे जिल्ह्यातील लिंगाळी विविध विकास सोसायटीचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना माझ्याविरोधात माझ्या पुतण्यास उभे केले. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला, माझ्याविरोधात त्या पोराला नको पोराला उभे करू, तेव्हा त्याने ऐकले नाही. तो म्हणाला, साहेबाच्या मागे बारामती आहे. परंतु त्याला काय माहीत साहेबांच्या नंतर बारामती दादांच्या मागे उभी आहे. त्यावेळी माझ्या विरोधात सर्व खानदान प्रचारात उतरले होते. मी मात्र शांत राहिलो. बारामती माझ्या पाठिशीच राहिली.

शरद पवार महाविकास आघाडीत नाराज ! काय आहे कारण ?

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडी समन्वयाचा अभाव असल्याने शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यात. या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पराभवावर चिंतन आणि मंथन करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक झाली नाही. यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका निवडणुकांबाबत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मुंबई पालिका निवडणूक ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे, असं शरद पवार गटाचं मत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकत्रित बैठक आणि चर्चा होत नसल्याने शरद पवार महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसली पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय वाढला पाहिजे, असं शरद पवार यांचं मत आहे. बैठकांसाठी शरद पवार आग्रही आहेत पण नेत्यांचा पुढाकार नसल्याने मविआमध्ये नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

Thursday, January 9, 2025

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले ; आर एस एस बद्दल ठाकरे चांगले बोलू लागले... त्याबद्दल एकनाथ शिंदे काय म्हणाले ;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रात सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात सलोखा होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक होत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत चांगल्या गोष्टी ठाकरे यांची शिवसेना बोलू लागली आहे. त्यावरुन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.


काय म्हणाले एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते, मुख्यमंत्री देवेंद्रजींना यांना फडतूस म्हणत होते, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील, अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांनी ज्यांना झिडकारल, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मतदारांनी त्यांचा कचरा केला. ‘तुम लढो हम कपडे सांभालते’ हे तसे ‘तुम लढो हम बुके देके आते’ असे करत आहेत.

वाईत एटीएम फोडले ; 17 लाख केले लंपास ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
वाईतील एमआयडीसी मधील एटीएम चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून १७ लाखांची रोकड लंपास केली. वाईच्या एमआयडीसीतील मुख्य चौकात श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एटीएम आहे. हे एटीएम दररोज सकाळी सात वाजता उघडून रात्री ११ वाजता शटरला कुलपे लावून बंद केले जात होते
मंगळवारीच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला.

सुरेश धस अन् अजित पवारांमध्ये ‘मुन्नी वॉर’ ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. आज पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेवरही निशाणा साधला. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी अनेकजण मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं. दरम्यान, सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण? असा सवाल केला जात आहे. तर सुरेश धस यांनी मुन्नी नेमकी कोण? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. “मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही. राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेले आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिये…, ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत”, असे सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता दादा म्हणाले मुन्नी कोण हे आमदार धस यांनाच विचारा..त्यामुळे ही मुन्नी कोण? याची चर्चा आता सुरू झाली आहे

गेमचेंजर किंगमेकर- रामकृष्ण वेताळ साहेब....

वेध माझा ऑनलाइन।
स्वतःला काही मिळवण्यासाठी अनेक जण आज राजकारणामध्ये प्रवेश करतात. मात्र इतरांना काही देण्यासाठी समाजाचे,ऋण फेडण्यासाठी राजकारणामध्ये प्रवेश करणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आज शिल्लक आहेत. यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना खरा समाजकारणी म्हणून रामकृष्ण वेताळ साहेब यांचा चेहरा समाजापुढे येत आहे....
देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हातही घ्यावे...
 अशी सुंदर चारोळी महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे.ही चारोळी अनेकांची पाठ आहे. परंतु या चार ओळी प्रमाणे जीवन जगणे खूप अवघड असल्याने त्याप्रमाणे जगण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे खूप अवघड असते.म्हणून अनेक जण पोहणे सोडून देतात.मात्र रामकृष्ण वेताळ साहेब यांनी हाच मार्ग  त्यांनी आपल्या जीवनाची दिशा बनवला आहे.
    त्यामुळे काही मिळवण्यासाठी नाही तर फक्त इतरांना देण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.त्याचे एक साधेसुधे उदाहरण आहे.मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते स्वतः निवडणूक लढवत होते.त्याचबरोबर इतरांचा भारही ते उचलत होते.कराड उत्तर हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.आणि या मतदारसंघांमध्ये इतरांना यश मिळणारच नाही!अशी अनेकांची धारणा होती.या धारणेला प्रथम मूठमाती देण्याचे काम रामकृष्ण वेताळ यांनी करून दाखवणे.
   त्यांच्याच नेतृत्वाखाली कराड उत्तर मध्ये एक जिल्हा परिषद सदस्य,दोन पंचायत समिती सदस्य भाजपा च्या कमळ चिन्हावर निवडून आले. त्याचबरोबर प्रत्येक मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी लक्षात राहतील अशी घवघवीत मते मिळाली.याच घटनेने त्यांची ओळख गेम चेंजर किंग मेकर अशी झाली. 
    यानंतर ज्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.स्वतःसाठी काही मिळवायचे आहे.असा प्रयत्न त्यांनी केला नाही.जे हवे आहे ते इतरांसाठी यासाठीच ते धडपडत राहिले.स्वतःच्या व्यवसायाची घोडदौड अबाधित राखत त्यांनी राजकारणामध्ये यशस्वी मजल मारण्याचा प्रयत्न केला.लग्न,वाढदिवस,सुखदुःखाचे प्रसंग,यात्रा या सर्वांना हजेरी लावत त्यांनी लोकसंग्रह करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत निवडणुका,सोसायटीच्या निवडणुका यामध्ये गावागावात सक्षम नेतृत्वाची फळी निर्माण करून त्यांना सहाय्य केले.प्रसंगी पदारमोडे केली. यामुळे कराड उत्तर मतदार संघातील वातावरण हळूहळू बदलत गेले. गावागावात ग्रामपंचायतचे,सोसायटीचे सदस्य भाजपाचे दिसू लागले आणि भाजपांला उत्तरेत नवी उभारी मिळत गेली. त्यांनी आपल्या कार्य कौशल्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मरळी भगतवाडी रस्ता,शिवडे भवानवाडी रस्ता सुर्ली ते कामथी पाचुंद रस्ता, गजानन हाउसिंग सोसायटी विरवडे करवडी रस्ता असे हजारो कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यामध्ये आपले सक्रिय योगदान दिले आहे.त्याचबरोबर शामगाव शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपसा जलसिंचन योजना कशी राबवता येईल याबाबत सविस्तर माहिती शासन स्तरावर पुरवली असल्याने ही कामे सध्या गतिमान असल्याचे पाहायला मिळते.
    भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे त्यांना सरचिटणीस पद मिळाले.या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले.अनेक युवकांना किसान मोर्चाशी जोडून विविध पदे मिळवून दिली.मानाच्या आणि लोकहिताचे काम होत असलेल्या पदावरती अनेकांना काम करण्याची संधी देऊन त्यांनाही नावलौकिक प्राप्त करून दिला.यावर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघात प्रयत्नांची पराठा केली. राजकारणामध्ये रामकृष्ण वेताळ साहेब यांचे आयडॉल हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आहेत आणि खासदारकीच्या निवडणुकीत आपल्या राजकीय आयडालला सहकार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गावोगावी गाठीभेटी आणि दौरे करून महाराजांच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलला.त्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रामकृष्ण वेताळ यांचे कार्य कौशल्य जाण त्यांना आपले शिलेदार बनवले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक त्यांनी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार म्हणून दादा घोरपडे यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला आहे.या वेळेस हेवेदावे विसरून एकत्र राहणे कसे गरजेचे आहे.यश मिळाले तर किती आनंद होईल आणि किती दिवसाच्या परिश्रमाचे साफल्य होईल हे त्यांनी युवकांना,मध्यमवर्ग यांना पटवून दिले.मी स्वतःच उमेदवार आहे असे समजून काम करीत रहा.हे लोकांना पटवून दिले.त्यांनीच बूथ कमिट्या,पन्ना प्रमुख यासारखे अनेक पदाधिकारी निर्मिती केली. प्रत्येकाशी वैयक्तिक लोकसंपर्क ठेवला होता.त्यामुळे निवडणुकीच्या अखेरपर्यंत ते सक्रिय राहून विजयी वाटचाल यशस्वी करण्यात अग्रेसर राहिले. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढत आहे.परिणामी समाजकारणामध्ये गेम चेंजर किंग मेकर अशी त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत गेली आहे.गावागावात लहान मुलांपासून पोरांच्या तोंडी त्यांचे नाव सातत्याने येत आहे.यासाठी फक्त त्यांनी घेतलेले परिश्रम हे एकच तत्व उपयोगी पडले आहे.म्हणूनच मागील 60 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात परिवर्तन घडवणे शक्य झाले आहे.या मतदारसंघात परिवर्तन कधी होणारच नाही अशीच अनेकांची धारणा होती.परंतु प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे.... याची पूर्ण जाणीव असलेले रामकृष्ण वेताळ थांबायला तयार नाहीत. त्यांनी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पराभूत करता येते हे हे समाजाला आपल्या परिश्रमाने दाखवून दिले.जिद्द,चिकाटी,परिश्रम यापुढे कोणतेही यश अशक्य नाही.याची जाणीव त्यांना लहानपणापासूनच आहे.याच जाणीवे नुसार ते आज पर्यंत काम करीत आहेत. हार होईल अथवा जीत होईल.हार झाली तर खचून जायचे नाही आणि जीत मिळाली तर हुरळून जायचे नाही.आपले काम खंड चालू ठेवायचे. असा त्यांचा खाक्या असल्यामुळे आज पर्यंत ते यशस्वी मार्गावरून वाटचाल करत आहेत. त्यांच्या यशाचे गमक आज अनेकांनी जाणल्यामुळे कराड उत्तर मतदार संघातील लोकांच्या मते त्यांची प्रतिमा गेम चेंजर किंग मेकर अशीच बनवली आहे.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते सध्या किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार आणि कार्य लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात.ते सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात आणि विशेषता कराड उत्तर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सूचनेनुसार पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवून आपली किंगमेकर ही ओळख अबाधित ठेवण्यात त्यांना यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. अशा या सर्व काही झोकून देणाऱ्या समाजकारणी नेत्याचा 10 जानेवारी हा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे.या वाढदिवसानिमित्त त्यांना जनतेकडून आणि श्रीमंत रामकृष्ण वेताळ प्रेमी नागरिकांच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

शब्दांकन संदीप कोरडे

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ;

वेध माझा ऑनलाइन
सरकारी विभाग व कार्यालयांची वेबसाईट अद्ययावत करावी. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करावे. शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दरम्यान, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सूचना केल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार आहे.

यावेळी साताऱ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी. अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावीत. खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. अधिकार्‍यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी प्रसाधनगृह स्वच्छ असावे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत.


प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, यासाठी प्रयत्न करावा. अधिकारी व नागरिकांना आवश्यक माहिती फलकावर नमूद करावी. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या या तालुका व जिल्हास्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी झाल्या पाहिजेत. त्याचे वेळापत्रक निश्चित करावे. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, बुधवारी 
सातारा शहरात १४.९, तर महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी महाबळेश्वरपेक्षा साताऱ्यात थंडीची परिणामकारकता अधिक होती.  सायंकाळी सहा वाजलेनंतरच थंडी जाणवायला सुरुवात होते. रात्री दहानंतर तर कडाक्याची थंडी पडत आहे. सकाळी नऊ वाजले तरी अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे.  यामुळे दुपारी १२ नंतरही अंगाला गारवा झोंबत असल्याचे चित्र आहे. अजूनही काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. 

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ; काय आहे बातमी ?

 वेध माझा ऑनलाइन| सरकारी विभाग व कार्यालयांची वेबसाईट अद्ययावत करावी. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करावे. शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दरम्यान, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य (व्हीसी) प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. 
 
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सूचना केल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार आहे.
यावेळी साताऱ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी. अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावीत. खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. अधिकार्‍यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी प्रसाधनगृह स्वच्छ असावे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत.

फडणवीसांनी केलेल्या सूचना

प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, यासाठी प्रयत्न करावा. अधिकारी व नागरिकांना आवश्यक माहिती फलकावर नमूद करावी. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या या तालुका व जिल्हास्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी झाल्या पाहिजेत. त्याचे वेळापत्रक निश्चित करावे. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या ! ;एका खडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासणार !;

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कारवाईला वेग आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. कृष्णा आंधळे एकमेव आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला होता, अशी कबुली काही दिवसांपूर्वी विष्णू चाटे यानं दिली होती. आता या प्रकरणात वाल्मिक कराडभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.आज बुधवारी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहे. वाल्मिक कराड याने खंडणी प्रकरणात फोनवरून पवनचक्की कंपनीच्या मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप आहे. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या ...वाल्मिक कराड यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे दाखल असताना ईडी कारवाई का नाही?

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी संचालनालय आणि पीएमएलए नुसार कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु आठ महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे म्हणाले...धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात

वेध माझा ऑनलाइन
धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही, त्यांने कितीही गुन्हे दाखल केले तरी बेहत्तर असंही जरांगे म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते. 

मनोज जरांगे म्हणाले की, "संतोष देशमुखांच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडांच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचं षडयंत्र केलं जातंय. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थी बगलबच्च्यांचं काम आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलनं करायला लावता, आरोपीच्या मागे उभे राहता. हे चुकीचं नाही का? उद्या तुमच्या घरातील कुणी मेले तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? जर आरोपीला साथ द्यायचं असं झालं तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील."

महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली ; महाविकास आघाडीला धक्का

वेध माझा ऑनलाइन
राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरअध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल याचिका केली होती. मात्र, हायकोर्टाकडून महाविकास आघाडीची याचिका फेटाळल्याने ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय. 

तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोष्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद रंगला होता.  महाविकास आघाडी सरकारनं 6 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 आमदारांच्या नावाची यादी पाठवली होती. ही यादी 5 सप्टेंबर 2022 रोजी मागे घेण्यात आली. यादी मागे घेण्याचा निर्णय कैबिनेटच्या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा महायुती सरकारनं हायकोर्टात केला होता. मात्र कोणतीही कारणं न देता यादी मागे घेणं गैर असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला होता. 



Wednesday, January 8, 2025

महाविकास आघाडीच्या काही पराभूत आमदारांसह पृथ्वीराज चव्हाण यांची निवडणूक निकालाच्या विरोधात न्यायालयात धाव ; 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला असला, तरी निवडणूक प्रक्रियेवरून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र अजूनही सुरूच आहेत. निवडणूक निकाला विरोधात याचिका दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 35 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल झाल आहेत. याचिका मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाले असून विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीतील कवित्व अजूनही पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील बारा पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सर्वाधिक महिला अहिल्या नगर जिल्ह्यातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 
दरम्यान, महाविकास आघाडीमधील पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, महेश कोठे, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे यांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक निकाल विरोधामध्ये धाव घेतली आहे,


महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन
गेल्या काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डाच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. तसेच नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल, त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांची चर्चा करत असल्याचे सांगितले आहे. शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.

शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे
त्यातच आता दादा भुसे यांनी मराठी शिकवणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. “केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे”, अशी सूचना दादा भुसे यांनी दिली आहे.

Monday, January 6, 2025

धंनजय मुंडे राजीनामा देणार ?

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना होत आला तरी या प्रकरणात अनेक घडामोडी सुरु आहेत. या प्रकरणी गेल्या महिन्याभरापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच त्यांच्या राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील आक्रमक होत आहेत.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, बीडचे खासदार आमदारांनी भेट घेतली आहे.सर्वांची मागणी एकच आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं भाजप आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे धस म्हणाले. स्वपक्षाची कुठेही नाराजी नाही. मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बोलणार आहे. मी मात्र संतोष देशमुखबद्दल बोलणं थांबवणार नाही असेही धस म्हणाले. अजितदादांवर काय टीका केली, त्यांना लागायचं काय कारण आहे, असंही धस म्हणाले.
माझ्याकडून अनवधानाने एक शब्द अरे तुरे केला तो शब्द परत घेतलाय. अजित दादांवर माझा हक्क आहे अरे तुरे बोलण्याचा असेही धस म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत मी फार काळ काम केले आहे. अधिकार वाणीने मी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता असे सुरेश धस म्हणाले. एक नैतिक जबाबदारी म्हणून अरे तुरेची भाषा करायला नको होती, मी दिलगिरी व्यक्त करतो असेही सुरेश धस म्हणाले.

दोन कोटी खंडणीची डील मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाली - भाजपचे आमदार सुरेश धस यांचा धक्कादायक आरोप ; राजकारणात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन -
ज्या खंडणीच्या आरोपात ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याच दोन कोटी खंडणीची डील मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 

यानंतर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाच्या वादाचं लोण महायुतीत अजित पवार गट विरूद्ध भाजप असं होतंय का याची चर्चा रंगतेय. 2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? झाल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धसांनी केला आहे. इतकंच नाहीतर दावा खोटा ठरल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं आव्हानही सुरेश धस यांनी दिलं. वाल्मिक कराडने जितकी माया जमवली त्यानुसार या प्रकरणाची ईडीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी सुरेश धसांनी केली आहे. ज्या गाडीतून वाल्मिक कराड सरेंडर झाला त्या गाडीच्या मालकाने आपली सीआयडी कार्यालय जवळ भेट झाली. त्यावेळी वाल्मिक कराडने सीआयडी ऑफिसपर्यंत लिफ्ट मागितली. त्यामुळे त्यांना गाडीतून सोडल्याचा दावा केला. त्यानंतर बजरंग सोनावणे यांनी सुद्धा यावर सडकून टीका केली



वेध माझा ऑनलाइन।
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांसाठी वापरलेले शब्द आता वादात आलेत. नेत्यांनी एकमेकांना शिव्या-शाप दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांनी फक्क मतदारांनाच शिव्या देण्याची काय ती कसर शिल्लक ठेवली होती, त्याचीच पूर्तता आता शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या जीभेच्या धारेनं पूर्ण करून टाकली. संजय गायकवाड निवडणून आले असते तरी त्यांच्या मनात कमी मताधिक्यानं नाराजी आहे. हीच नाराजी त्यांनी भरसभेतून बोलून दाखवली. ज्या जनतेचा कैवार घेऊन आमदारकीची शपथ घेतली त्याच्याच समोर गायकवाडांच्या जीभेने दलाल आणि वेश्यांच्या पिंजऱ्यात उभं केलं., 

तर दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांनी जमलेल्या लोकांचा पाणउतारा केला. निवडणुकीवेळी हा भाऊ बहिणीला ओवाळणी टाकणार, अहोरात्र काम करणार म्हणून अजित पवार यांनी मतदारांपुढे मतांचा जोगावा मागितला होता. निकालानंतर तुम्ही मतं दिलीत म्हणून तुम्ही मालक नाही झालात, अशी उर्मट भाषा अजित पवारांनी केली. गरज सरो अन् वैद्य मरो… ही म्हण सर्वच राजकीय नेत्यांना कमी-अधिक फरकाने लागू होते. प्रचाराच्या कंबर दुखीपर्यंत पाया पडणारे नम्रतेचा आव आणून नमस्कार करणारे हे हातच मतदारांकडे आता वेश्या म्हणून बोट दाखवतायत.

प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना सोमवारी पहाटे अटक ;

वेध माझा ऑनलाइन
प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पटना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीपीएससी परीक्षा पेपर लीक प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी ते अनिश्चितकाळासाठी आमरण उपोषणाला बसले होते. प्रशांत किशोर हे गांधी मुर्ती येथे आमरण उपोषणाला बसले होते. पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत घालून AIIMS रुग्णालयात घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी कुठलेही उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी रुग्णालयातही आपण उपोषण आंदोलन कायम ठेवलं आहे. पटना पोलीस आणि जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या समर्थकांमध्ये एम्सच्या बाहेर झडप झाली.

जेष्ठना व लहान मुलांना "या' व्हायरसची लागण ;

वेध माझा ऑनलाइन
कोरोनासारखा महाखतरनाक व्हायरस देणाऱ्या चीनमध्ये आता आणखी एक व्हायरस निर्माण झाला आहे. हा व्हायरस अत्यंत खतरनाक आहे. या व्हायरसने बंगळुरूत दस्तकही दिली आहे. चीनच्या HMPV या महाखतरनाक व्हायरसची लागण बंगळुरूतील एका 8 महिन्याच्या मुलाला झाली आहे. ताप आल्याने या बाळाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या रक्ताची चाचणी केल्यानंतर त्याच्या शरीरात एचएमपीव्ही व्हायरस असल्याचं निदान झालं. बंगळुरूच्या लॅबने ही पुष्टी केली आहे. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, चीनचा हा महाभयंकर व्हायरस भारतात आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरस अत्यंत वेगाने पसरत आहे. त्याचा प्रकोप पाहून चीनच्या अनेक राज्यात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. चीनच्या अनेक भागातील परिस्थिती बिघडली आहे. 

लाडकि बहिण योजना : ‘या’ महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार !

वेध माझा ऑनलाईन - 
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घोषित केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या निकालात चांगलीच गेम चेंजर ठरली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.  राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. दरम्यान निवडणुकीत विजय झाल्यानंतर लाभार्थी महिलांना १५०० रूपये मिळणारा हफ्ता वाढवून २१०० रूपये करणार असल्याचे वक्तव्य महायुतीच्या नेत्यांनी केलं होतं. दरम्यान महायुतीचं सरकार पुन्हा राज्यात आल्यानंतर २१०० रूपयांचा हफ्ता कधी याकडे साऱ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं असताना महायुती सरकारमधील मंत्र्यानं मोठं वक्तव्य केले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं.

Sunday, January 5, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हीडिओ व्हायरल ;

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे. एका 24 वर्षीय तरुणाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यासंदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहे. त्यांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणे गाठले. अखेर पोलिसांनी त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा तरुणाचे नाव हितेश प्रभाकर धेंडे (वय-24 ) आहे. तो ठाण्यातील श्रीनगर वारली पाडा या भागात राहतो. त्याने एकनाथ शिंदे यांना जीव मारण्याची धमकी देणारी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली. त्यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यासंदर्भात बोलताना ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी म्हणाले, धेंडे याने एकनाथ शिंदे साहेबांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिविगाळ करणारी पोस्ट टाकली. रात्री त्यांचा घरावर गोळीबार करणार अशी पोस्ट त्याने इंस्टग्रामवर केली होती.
हितेश धेंडे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक श्रीनगर पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्याच्यावर श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत

माधव भंडारी म्हणाले...ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही ;

वेध माझा ऑनलाइन
ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाटा दुर्लक्ष करण्यासारखं नाही. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान खूप मोठं आहे. देशात समाज सुधारण्यासाठीच्या चळवळी झाल्या त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू असे भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटलं. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे अत्रे नाट्यगृहात राज्यभरात निवडून आलेल्या ब्राह्मण आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात भंडारी बोलत होते

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा कल्याणमध्ये आयोजित करण्यात आला होता. कल्याण ब्राह्मण सभेतर्फे कल्याणच्या आचार्य अत्रे सभागृहात या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किरण सामंत, संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, सांगलीचे आमदार  सुधीर गाडगीळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन;

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या पत्‍नी मेघना गजानन कीर्तिकर यांचे आज पहाटे 3:30 च्या सुमारास अल्‍पश: आजाराने निधन झाले. वयाच्‍या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोरेगावमध्ये गजानन कीर्तिकर यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार रवींद्र वायकर सोबत सिद्धेश कदम पोहचले आहेत...त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अंत्यदर्शन घेतले आहे.

धंनजय मुंडे यांच्यामुळे पक्ष अडचणीत येणार असेल तर...छगन भुजबळ यांचे मोठे विधान

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. या सर्व चर्चांवर छगन भुजबळ यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. मी भाजपमध्ये जाणार? मी नाराज आहे, हे सगळं सोडून द्या असे भुजबळ म्हणाले. कुणाचे मंत्रिपद जाऊन मला मिळावे अशी इच्छा मी जन्मातही करत नाही असंही ते म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांची चौकशी होईल आणि जे काय करायचे ते करतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. मला कुणाच्याही राजीनाम्याची घाई करायची गरज नाही. धनंजय मुंडे यांच्यामुळं पक्ष अडचणीत येणार असेल तर त्याबाबत अजित पवार पाहतील... असेही भुजबळ म्हणाले. ते नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोर्टाचा वाल्मिक कराडला दणका ; कोर्ट म्हणाले... तुरुंगात आहात...

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गु्न्ह्यात वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराडने कोर्टाकडे अर्ज करत खास सुविधेसाठी हात जोडले होते. मात्र, कोर्टाने वाल्मिक कराडला दणका दिला आहे. तुरुंगात आहात, त्यामुळे शासकीय सुविधाच वापरण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत तुरुंगात 24 तास मदतनीसाची मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचे कारण देत ही मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा, याचे नावही कोर्टाला दिले होते. वाल्मिक कराडच्या विनंती अर्जावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावला आहे.

न्यायालयाने म्हटले की...
वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाने केवळ शासकीय व्यक्तीकडून मिळणार सुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार झाला असल्याचा दावा वाल्मिक कराडने आपल्या अर्जात केला होता. याच आजारातील उपचाराचा एक भाग म्हणून खाजगी व्यक्ती काळजीवाहू म्हणून देण्याची विनंती वाल्मिक कराडने केली होती. या आजारातील उपचारासाठी सी पॅप मशीन चालवण्यासाठी खासगी मदतनीस देण्याची मागणी केली होती. मात्र, कोठडीत असल्याने खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना देखील कोर्टाने केली.
वाल्मिक कराडने कोर्टाला केलेल्या विनंतीत म्हटले की, आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावा, अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. 

लोकसभा लढवली नाही म्हणून मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळालं नाह ? ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
लोकसभेत पराभव झालेल्या इतरांना मंत्रिपदं मिळाली, पण आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही यामागे निवडणूक लढवण्यास जाहीर अनुत्सुकता दाखवल्याची शक्यता असेल असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी काही तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी शक्यता बोलून दाखवल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. राज्यमंत्रिमंडळातून डावलल्यानंतर सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या सर्वांवर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलास चर्चा केली. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "लोकसभा लढण्याची माझी इच्छा नव्हती. पण मंत्रिपद मिळालं नाही यामागे निश्चित काय कारण आहे हे मला माहिती नाही. दिल्लीत मंत्रिपद देताना काय विचार केला जातो हे मला माहिती नाही. पक्षासाठी जर हे योग्य असेल तर ते स्वीकारावं लागेल. मला अर्थमंत्री म्हणून संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. मी प्रदेशाध्यक्ष असताना खडकवासला, अमरावती पदवीधर, शिक्षक मतदारसंघ, भंडारा गोंदीया जिल्हा परिषदा जिंकल्या. कदाचित दुसऱ्यांना संधी देण्यासाठी पक्षाने विचार केला असेल. पण ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. आपल्यातील उणिवा लक्षात येतात. कदाचित अजून काही संधी मिळाली तर तीही आनंदाने पार पाडेन."
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मी लोकसभेत जाऊ इच्छित नव्हतो. माझ्या मनात महाराष्ट्रासाठी काही कल्पना होत्या. त्या अंमलात आणायच्या होत्या. छत्रपतींचा विचार मला प्रत्येक घर ते जगात पोहोचवायचा होता. सांस्कृतिक मंत्री म्हणून काम करताना अजून काही गोष्टी करायच्या होत्या. म्हणून लोकसभेत जायची इच्छा नव्हती."

मलकापूर येथील हौसाई विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळ्याचे आयोजन ; पालक आणि विद्यार्थी वर्गाचा भरभरून प्रतिसाद ;

वेध माझा ऑनलाइन
मलकापुरातील हौसाई विद्यालयात विविध गुणदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला. 

या सोहळ्याचे उद्घाटन मलकापूर नगरीच्या माजी नगरसेविका अनिता यादव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पाठक, सैनिक विभागाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, पाटील मॅडम, कल्याण कुलकर्णी उपस्थित होते. 
यावेळी लावणी, देशभक्तीपर गीते, लहान मुलांची बडबड गीते, कृष्ण भक्तीची गीते, मराठी गीते विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आली. 
कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी ऋषिकेश पोटे, अंजना जानुगडे, बालाजी मुंडे, वीरभद्र कुरपे, विकास शिंगाडे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केली रेठरे बुद्रुक येथील नदीकाठाची पाहणी ; यावेळी आमदार भोसले काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन।
रेठरे बुद्रुक गावाला सुंदर नदीचा काठ लाभला आहे. या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना, कराड दक्षिण विधानसभेचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. दरम्यान, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासमवेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील नदीकाठाची पाहणी केली. 

रेठरे बुद्रुक गावातील कृष्णा नदीचा काठ विकसित करण्याचा संकल्प आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी व आर्किटेक्ट यांच्यासमवेत आ.डॉ. अतुलबाबा भोसले व डॉ. सुरेश भोसले यांनी नदीकाठ परिसराची पाहणी केली. 

यावेळी बोलताना डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुक गावाला लाभलेला नदीचा काठ ही गावाला मिळालेली मोठी भाग्याची गोष्ट आहे. या भागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी, नदीकाठाचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासनाने नदीकाठ विकासाचा नवीन आराखडा तयार करावा. तसेच त्यामध्ये पूरसंरक्षक भिंतीसह या जागेवर खुले सभागृह, ऑडिटोरिअम, उद्यान, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा पार्क, बालोद्यान, बोटींगची सुविध, फूड कोर्ट, भक्त निवास, लेजर शो व कारंजे यांचा समावेश असावा. तसेच याठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प साकारल्यास, यासाठी आवश्यक विजेचा पुरवठा मोफत होऊ शकेल. रेठरे बुद्रुकचे नाव राज्यात नावारुपाला येईल, अशा प्रकारचे सुशोभीकरण या नदीकाठावर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नदीकाठचा परिसर सुशोभीत झाल्यामुळे इथल्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. शिवाय यामुळे स्थानिक व्यवसायिकांनादेखील याचा लाभ होईल, असा विश्वास डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. 

यावेळी सरपंच हणमंत सूर्यवंशी, आर्किटेक तुषार पाटील, माजी पं. स. सदस्य संजय पवार, जयवंतराव साळुंखे, बापुराव मोहिते, प्रमोद मोहिते, सुहास घोडके, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोईफोडे, शरद धर्मे, सचिन जाधव, जितेंद्र साळुंखे, विक्रम साळुंखे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

जिल्हा परिषदेची शाळा स्मार्ट बनविणार..

याप्रसंगी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी रेठरे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय कामकाजाचा आढावा घेत, शालेय इमारतीची व वर्गखोल्यांची पाहणी केली. शाळेच्या नूतन इमारतीसाठी आराखडा सादर करण्याच्या सूचना करत, शाळेत डिजीटल क्लासरुम, अत्याधुनिक ग्रंथालय व सुसज्ज पटांगण विकासित करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद ; सातारा जिल्ह्यात पारा उतरला ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे. यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागली आहे.  जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या मध्यावर थंडीचा कडाका पडला होता. त्यातच उत्तर भागातून शीतलहर होती. त्यामुळे किमान तापमानात सतत उतार येत गेला. परिणामी सातारा शहराचा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला होता. हे तापमान मागील तीन वर्षातील तीन नीच्चांकी ठरले होते. याचदरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचेही किमान तापमान ११ अंशांपर्यंत उरतले होते. यामुळे थंडीची लाट आल्यासारखी स्थिती होती.

ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल ; सुधीर मुनगंटीवार यांचा नेमका रोख कोणावर?

वेध माझा ऑनलाइन
मला मंत्रिपद का मिळालं नाही याची निश्चित माहिती नाही. पण ज्याला कुणाला माझं मंत्रिपद काढून घेण्यात आनंद वाटला त्याला नंतर खंत वाटेल असं काम करण्यासाठी मी मेहनत घेणार असा विश्वास भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. पक्षाचा मूळ विचार कायम ठेवण्यासाठी काही जणांना बलिदान द्यावं लागतं. मलाही तेच करावं लागलं. पण सत्तेचं संगमरवरी स्मारक बांधताना मूळ विचारांची कबर विसरू नये असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एका माध्यम समूहाशी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी हे मत व्यक्त केलं

तुम्हाला पक्ष सोडून जायचं असेल तर खुशाल जा ; राजन साळवी यांच्यावर उद्धव ठाकरे भडकले ;

वेध माझा ऑनलाईन
गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत विनायक राऊत यांच्या विरोधात तक्रारीचा पाढाच वाचला. विधानसभेत झालेल्या पराभवाला विनायक राऊत हेच जबाबदार असून त्यांचे उदय सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर विनायक राऊतांना पक्षातून काढू का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना सुनावल्याची माहिती आहे

राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चा सुरु असतानाच राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी साळवी यांनी पराभवानंतरच्या आपल्या भावना उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्या. मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या, त्या उद्धवसाहेबापर्यंत पोहचवल्याचं यावेळी राजन साळवींनी म्हटलं. आता उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असं राजन साळवींनी यावेळी म्हटलं.

सरकारविरोधात आवाज काढताच कार्टुनिस्ट सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून नोटीस ;

वेध माझा ऑनलाइन।
सरकारविरोधात आवाज काढताच कार्टुनिस्ट सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती यांच्यातील संबंध आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्षाबाबत काही व्यंगचित्र काढले होते. आचार्य यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, सरकारविरोधात व्यंगचित्र काढल्यानंतर आता सतीश आचार्य यांना मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची नोटीस आल्याचे बोलले जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.दरम्यान, नोटीस आल्यानंतर सतीश आचार्य यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे. "हे जाणून खूप आनंद झालाय की मुंबई कायदा आणि सुव्यवस्थेसह शांत आहे. त्यामुळे व्यंगचित्रावर त्यांनी लक्ष करण्यात आलंय", असं आचार्य म्हणाले आहेत.

धनंजय मुंडे,पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ होतोय ;अंजली दमानिया यांचा आरोप ; मुख्यमंत्री फडणवीस यांची भेटण्यासाठी मागितली वेळ ;

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे  सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडमधील दंडेलशाहीविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. संतोष देशमुख हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात आज (5 जानेवारी) पत्रकार परिषद घेणार असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

दमानिया यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, मी आज दुपारी 12 वाजता माझ्या निवासस्थानावरून पत्रकार परिषद घेणार आहे. प्रचंड प्रमाणात मानसिक छळ केल्याचा आरोप करत दमानिया यांनी ते कोण आहेत त्याचा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. माझा प्रचंड छळ केला जात असून या संदर्भात वरिष्ठांना भेटणार असल्याचेही सांगितले. असा महाराष्ट्र आहे का? अशी विचारणाही दमानिया यांनी केली.  दरम्यान, आपण पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली आहे. दोघांच्या भेटीची वेळ मागितली असून मी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलेन, असे त्यांनी सांगितले

मदत करणाऱ्यांना देखील आम्ही सोडत नाही ; संतोष देखमुख प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगूनच टाकले ;

वेध माझा ऑनलाइन।
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या वाल्मिक कराड यांना चौकशीसाठी सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी देखील सुरु आहे. पण हे वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे.  धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आरोपी कुठेही गेले असतील, कोणीही मदत केली असली तरी त्यांच्यावर कारवाई सुरु आहे हे दिसतंय. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाहीय. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करु नये,  सरपंचाची हत्या झाली आहे. त्या हत्येचं राजकारण होऊ नये, तर समाजात काहीतरी सुधार व्हावा...असा आमचा प्रयत्न आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.