Wednesday, March 24, 2021

123 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; राज्यात आज दिवसभरात तब्बल 28 हजार 699 नवे कोरोनाबाधित रुग्ण...

सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 123 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान,महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 28 हजार 699 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.

*एकूण नमुने -389669*
*एकूण बाधित -62875* 
 *घरी सोडण्यात आलेले -58705*  
*मृत्यू -1889* 
*उपचारार्थ रुग्ण-2281* 
00000

No comments:

Post a Comment