Tuesday, March 9, 2021

इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या वतीने महिला दिन साजरा...

कराड
इनरव्हील क्लब ऑफ कराड ने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय उपजिल्हा रुग्णालय (कॉटेज हॉस्पिटल) कराड येथील बाळांतीन महीलांना पोषक आहार व नवजात बालकांना सुरकी व टोपडी भेट देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील एकूण 30 महिलांना व त्यांच्या शिशु ना या कीटचे वाटप करण्यात आले. विशेष बाब म्हणजे आजच्या 8 मार्च च्या महिला दिनादिवशी जन्मलेल्या मुलीचे व तिच्या मातेचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करीत असणाऱ्या महिला स्टाफचाही महिला दिनानिमित्त भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
  याप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ कराड च्या प्रेसिडेंट रुपाली डांगे, सेक्रेटरी सीमा पुरोहित, चार्टर्ड प्रेसिडेंट रेखा काशीद, सदस्या रचना व्यास व इतर सदस्य तसेच कराड उपजिल्हा रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे व त्यांचे सर्व स्टाफ उपस्थित होत्या. डॉ. शिंदे यांनी इनरव्हील क्लब ऑफ कराड च्या या उपक्रमाचे कौतुक केले. तर प्रेसिडेंट रुपाली डांगे यांनी डॉ शिंदे व सर्व स्टाफचे आभार मानले.

No comments:

Post a Comment