Wednesday, March 31, 2021

मी मंजूर केलेली अम्ब्युलन्स अद्याप लोकांच्या सेवेसाठी नाही ही गँभीर बाब... कराड पालिकेला ती नको असेल तर तसा ठराव करून द्यावा...आमदार पृथ्वीराजबाबा कडाडले...


कराड
येथील पालीकेला मागील कोविड चा पीक पिरियड सुरू असताना मी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती ती अद्याप का पालिकेने ताब्यात घेतली नाही याचे उत्तर मला अजून मिळालेले नाही जर पालिकेला ती नको असेल तर बाबडतोब तसा ठराव करून पालिकेने तो सादर करावा म्हणजे तो निधी शहराच्या दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामाला टाकता येईल असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मागील कोरोनाच्या सुरू असणाऱ्या शहरातील पीक पिरियड मध्ये शहरातील रुग्ण संख्या खूपच अधिक वाढत असताना रुग्णांना हॉस्पिटल मधून बेड मिळत नव्हते उपचारासाठी दुसऱ्या गावी रुग्णांची पळापळ होत होती प्रॉपर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू दर वाढला होता त्याचवेळी आ पृथ्वीराजबाबानी कराड व मलकापूर शहरासाठी प्रत्येकी एक अम्ब्युलन्स मंजूर केली होती तसेच येथे कोविड सेंटर सुरू करून त्यावेळी तुटवडा जाणवत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर व व्हेंटिलेतरची व्यवस्था देखील त्यांनी करून दिली होती त्यानुसार कराड पालिकेची अम्ब्युलन्स वगळता सर्व काही उपलब्ध झाले होते याविषयी बोलताना आ पृथ्वीराजबाबा आज म्हणाले येथील पालिकेला शहराची सेवा करण्याच्या ड्रीष्टीने आपण मलकापूर बरोबरीने एक अम्ब्युलन्स दिली असता अद्याप ती कराड पालिकेने का ताब्यात घेतली नाही? याचे उत्तर मला अजुनही मिळालेले नाही ही बाब गँभीर आहे जर पालिकेला ती नको असेल तर तस ठराव करून मला द्या मग मी त्यासाठीचा असलेला निधी शहरातील अन्य चांगल्या कामासाठी वळवतो. खासगी रुग्णवाहिका वापरण्याबाबत कोणाचा दबाव आहे का ? की जेणेकरून मंजूर झालेली रुग्णवाहिका पालिकेकडून ताब्यात घेतली जात नाहीये असा सवालही आ चव्हाण यांनी आज येथे बोलताना केला.


No comments:

Post a Comment