कराड
शहरातील लोकशाही आघाडीने एकूम 7 नवीन नाविन्यपूर्ण कामे मंजूर करून आणली आहेत त्यामुळे शहराच्या वैभवात भरच पडणार आहे.या एकून कामकरिता 7 कोटी 60 लाख मंजूर करण्यात आल्याची माहिती लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी दिली आहे ना बाळासाहेव पाटील यांच्या प्रयत्नातून व सौरभतात्यांच्या संकल्पनेतून हा निधी शहरासाठी उपलब्ध होणार आहे.
कृष्णा पूल परिसर सुशोभित करण्यासाठी आपल्या प्रभागासाठी तात्यांनी पालीकेतून त्याचा प्रस्ताव तयार करून घेतला त्यात रुकमिनी नगरच्या पूर्वेस संरक्षक भिंत,व मोकळ्या जागेत म्यूरल्स,वाकींग ट्रॅक, लॉन्स होणार आहे या कामाकरिता 80 लाखाची मंजुरी मिळाली आहे
मंडईतील सोमेशवर मंदिरानजीक आरक्षण क्रमांक 26आहे तिथे 100 गाड्या पार्क होतील अशी मेकॅनिकल पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासाठी 3 कोटी मंजूर करण्यात आलेत
यशवन्तराव चव्हाण स्मृतिसदनात कलादालन आहे तिथे प्रदर्शन कार्यशाळेचे इव्हेंट्स व्हावेत हा हेतू होता मात्र तिथे सुविधा नव्हत्या त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून सौरभ तात्यांनी या कामासाठी 50 लाखाची तरतूद करून घेतली आहे
श्री हॉस्पिटल समोरील आरक्षण क्रमांक 53 या जागेत स्केटिंग रिंग टेनिस कोर्ट शूटिंग रेंज या क्रीडा व्यवस्था होणार आहेत यासाठी 2 कोटी मंजूर झालेत रंगार्वेस येथील महादेव मंदिरनजीक घाट निर्मितीसाठी 50 लाख तर संतसखू मंदिर परिसरात बगीचा निर्मितीसाठी 30 लाखाची तरतूद करण्यात आल्याचेही सौरभ पाटील यांनी सांगितले
No comments:
Post a Comment