कराड
मागील झालेल्या पालिका निंडणुकीतून निवडून आलेल्या जिल्ह्यातील लोकनियुक्त नगराध्यक्षाना फिरण्यासाठी वाहन उपलब्धता त्या त्या पालिकेने करून दिली आहे.मग मलकपूरच्या नगराध्यक्षा ना का नाही? असा सवाल आज आमदार प्रिथ्वीराजबाबा यांनी येथील सर्किट हाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित झाला, खरतर या प्रश्नाचे उत्तर मलकापूरचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी द्यायला हवे होते. कारण ते या पत्रकार परिषदेस हजर होते तरी ते गप्प बसले याचे सगळ्यांनाच असचर्य वाटले. परंतु ज्यांचा मलकापूरशी काहीही संबंध नाही. अशा अजितअप्पा पाटील- चिखलीकर यांनी मलकापूर नगरपालिकेची इमारत पूर्ण झाल्यानंतर खुर्चीसह मुराळकी देऊ असे उत्तर देऊन फक्त वेळ मारून नेली याविषयीची चर्चा सध्या मलकपूरसह सगळीकडेच जोरदार सुरू आहे.
नगरपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर मलकापुर नगरपरिषदेची पहिली निवडणूक पार पडून काहीवर्ष उलटून गेली तरी या पालिकेच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आलेल्या नीलम एडगे याना फिरण्यासाठी पालिकेच्या वतीने अजूनही वाहन उपलब्ध करून दिलेले नाही हे दुर्दैव आजही पहावयास मिळत आहे वास्तविक निवडणुकीनंतर जिल्यातील बहुतांशी लोकनियुक्त नगराध्यक्षना त्या त्या पालिकेने वाहन उपलब्ध करून दिली आहेत मलकापूर नगरपरिषद त्याला अजूनतरी अपवाद आहे मग सम्पूर्ण जिल्ह्यात हा विषय नेहमी चघळला जात असतानाच आज आमदार प्रिथ्वीराजबाबा यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत हाच प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी मलकपूरचा काही सम्बन्ध नसणाऱ्या अजितअप्पा चिखलीकर यांनी यावेळी पालिकेची इमारत होऊ दे मग खुर्चीसह मुराळकीपण देऊ असे वेळ मारून नेणारे उत्तर देऊन प्रश्नांला बगल दिली मात्र त्याचवेळी मलकपूरचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे त्याठिकाणी उपस्थित असतानाही या प्रश्नावर ते काहीच बोलले नाहीत याचेच सर्व पत्रकारांना असचर्य वाटले आणि याची चर्चाही सध्या मलकापुरात जोरात सुरू आहे.
No comments:
Post a Comment