Sunday, March 14, 2021

वाझे शिवसैनिकच होता... ना शंभूराज देसाई यांची वाझेच्या अटकेनंतर वादग्रस्त कबुली...आता भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष...


कराड
 मुंबई पोलीस खात्यातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांचा तपास चालू आहे. मात्र, त्यामध्ये केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे. खरंतर, यामध्ये केंद्राने हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नव्हती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत असे स्पष्ट वक्तव्य ना शंभूराज देसाई यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले,दरम्यान वाझे हे शिवसैनिकच होते अशी कबुलीही त्यांनी यावेळी बोलताना दिली. नुकतीच वाझेना अटक झाली आहे त्यानंतर ना देसाई यांनी आज ही कबुली दिल्याने आता नवीन वादाला तोंड फुटणार का? भाजपा आपली काय भूमिका घेणार? हेच आता यापुढे पहावे लागणार आहे...
        आज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
        गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मुंबई पोलीस तपासाच्या बाबतीत जगात दोन नंबरला असून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे करण्याची गरज नाही. मात्र, वाझे प्रकरणासह अन्य बाबतीतही केंद्र सरकारकडून वारंवार मुंबई, महाराष्ट्र्र पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप केला जातो, ही गोष्ट पुर्णतः चुकीची आहे. आमच्या पोलीसांचा तपास सुरू असून दोषी असलेल्या कुणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 भाजपा नेते चंद्रकांत दादा यानी वाझे शिवसैनिक आहेत असा गौप्यस्फोट केला होता त्याबाबत बोलताना ना शंभूराज देसाई म्हणाले, हो वाझे हे शिवसैनिकच होते मात्र ते पोलीस म्हणून कार्यरत असल्याने ते आता कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत चंद्रकांतदादांनी हे लक्षात घेऊन वक्तव्य केले पाहिजे. दरम्यान या प्रकरणी जे दोषी असतील त्याना आमचे सरकार पाठीशी घालणार नाही... असेही ते यावेळी बोलायला विसरले नाहीत... वाझे यांचा शिवसेनेशी शिवसैनिक म्हणून सम्बन्ध होता असे वाझे याना अटक झाल्यानंतर ना देसाई यांनी कबुली देत नवीन वाद उभा केला आहे. वाझे यांच्या राजीनाम्यासाठी व अटकेसाठी विरोधक प्रचंड आक्रमक होते शिवसेना त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही होत होता... पोलिसच अशी चुकीची कामे करत असतील... तर राज्यात कायदा सुव्यवस्था कशी राहणार.? वाझेना कोण पाठीशी घालतय? हे समोर आले पाहिजे... अशी विचारणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केली होती. 
सचिन वाझे हा पोलीस अधिकारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकानी भरलेली गाडी सापडल्या प्रकरणी अटकेत आहे अणि त्यातच ना.शंभूराज देसाईंनी वाझे शिवसेनेत होते अशी वादग्रस्त कबुली दिल्याने यापुढे काय राजकारण घडते... आणि भाजपा आपला काय पवित्रा घेते ? हेच यापुढे पहायचे आहे...

No comments:

Post a Comment