“माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी pos0itive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी”, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री केलंय.
जून 2020 मध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
यापूर्वी 12 जून 2020 रोजी धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 22 जून 2020 रोजी कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.
रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरेंनाही कोरोनाची लागण झालीय. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन होणार आहेत. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनाही कोरोना
गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे.
No comments:
Post a Comment