Thursday, March 11, 2021

MPSC परीक्षा वारंवार पुढे ढकलली जाणे अन्यायकारक : शिवराज मोरे

मुंबई:  MPSC ची पूर्व परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली असताना आयोगाने अचानक हि परीक्षा पुढे ढकलणे अन्यायकारक आहे अशी भूमिका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी मांडली आहे. या निर्णयाचा फेरविचार व्हावा यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत आयोगाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला जात असताना पोलिसांनी शिवराज मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना जाण्यास मज्जाव केला.

राज्यावर कोरोनाचे संकट जरी असले तरी योग्य ती खबरदारी घेऊन परीक्षा घेता येऊ शकते. परीक्षा अचानक पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी मध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. तिसऱ्यांदा हि परीक्षा पुढे ढकलली जात आहे. शेतकरी कष्टकऱ्यांची मुले अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास करीत असतात परीक्षा देऊन प्रयत्न करीत असतात. वर्षानुवर्षे अनेक इच्छावर पाणी सोडत अत्यंत कष्टाने परीक्षेची तयारी करत असतात. अश्या निर्णयामुळे परीक्षार्थीची मानसिकता बिघडू शकते ते आर्थिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या खचून जातात. तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होईल तसेच त्यांच्या वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण होत असतो. अश्या परिस्थितीत या अन्यायी निर्णयाविरोधात युवक काँग्रेस परीक्षार्थीच्या पूर्णपणे पाठीशी आहे व हा निर्णय मागे घेण्यास आंदोलनाद्वारे सरकारला भाग पाडणार असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी या दरम्यान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment