मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये शरद पवारांवर झाली शस्त्रक्रिया ...शरद पवारांनी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ला गुंतवून घेतलं आवडत्या कामात- खा.सुप्रिया सुळेनी केले ट्विट
मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर मेडिकल कॉम्पलिकेशन आणि इतर गोष्टींचा विचार करुन शरद पवारांवर बुधवारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया मंगळवारी रात्रीच करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे याांनी दिली पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. दरम्यान ब्रीच कँडीमध्ये पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवारांचा पहिला फोटो त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय
No comments:
Post a Comment