पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळेच आता कोरोना लसी वर देखील शंका उपस्थित केली जात आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घरातचं क्वारंटाइन झाले आहेत. पाकिस्तानच्या आरोग्यमंत्रींनी याबाबत माहिती दिली. 68 वर्षीय इम्रान खान हे सुरुवातीच्या काळात टॉप एथलिट आणि स्पोर्ट्समॅन होते. कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती.
इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस सिनोफार्म टोचून घेतली होती. कोरोना लसीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून असून आता चीनची लस घेतल्यानंतरच खान यांना कोरोनाची लागण झाल्याने चीनची कोरोना लस सेफ आहे का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
No comments:
Post a Comment