जनशक्ती चे अध्यक्ष माजी नगरसेवक अरुण जाधव आणि माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका श्रीमती शारदाताई जाधव यांनी आज आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिनी त्यांना शुभेच्छा देणारे फलक शहरात लावून आपला शहराच्या राजकारणातील यापुढील पवित्रा स्पष्ट केला आहे आ पृथ्वीराज बाबा यांचे नेतृत्व मानून आपली पुढील वाटचाल असेल हेच यातून त्यांनी आपल्या अनुयायांसाहित विरोधकानांही दाखवून दिले आहे
येथील पालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे नुकत्याच झालेल्या बजेट च्या सभेतून भाजपा व जनशक्ती आघाडीमध्ये तू तू मी मी झालेलं पहायला मिळाले त्याचे पडसाद म्हणून या दोन्ही पार्टयाकडून एकमेकांवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका टिप्पणी झाली या दरम्यान उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी याविषयी जनशक्तीच्या भूमिकेशी आपला सम्बन्ध नाही असे उपस्थित न राहता दाखवून देत पार्टीत असलेली फुटदेखील शहरासमोर यानिमित्ताने आली आहे तर, आ प्रिथ्वीराजबाबा यांच्या वाढदिनी जाधव गटानेदेखील त्यांना शुभेच्छा देत आपली वेगळी आणि स्पष्ट भूमिका लोकांसमोर आणली आहे सत्ताधारी पार्टीत असून आपले अस्तित्व स्वतंत्र असल्याचेच त्यांनी शहरासमोर सूचित केले आहे. जाधव गट "आघाडी' च्या अन्य कार्यक्रमालाही कधी फार उपस्थित दिसला नाही. आणि दिसला तर फक्त... ऑपचारीकच...!
येथील पालिका निवडणूक तोंडावर आहे त्याच अनुषंगाने शहरातील राजकीय डावपेच शांतपणे मात्र आत्तापासूनच सुरू आहेत ही निवडणूक पक्षचिन्हावर होईल असे राजकीय भाकीत आहे त्यामुळे भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच ही प्रमुख लढत झालेली दिसेल असे जाणकार सांगतात. आणि तसे झाल्यास... भाजपा चे नेतृत्व डॉ अतुल भोसले जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे करतील. तर राष्ट्रवादीचे ना बाळासाहेब पाटील व काँग्रेस चे आमदार प्रिथ्वीराजबाबा हे दोघे मिळून महाविकास आघाडी म्हणून एकत्र असतील तर त्यांना काँग्रेस नेते ऍड उदयदादा पाटील, शिवराज मोरे यांचीही मोलाची साथ असेल. शिवसेना म्हणून शहरातील अनेक निष्ठावंत या आघाडीत "बाबा' व "नामदारसाहेब' यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष आदेशावरून सहभागी असतील अशीही चर्चा आहे...
या निवडणुक काळात शहरातील प्रिथ्वीराजबाबा गटाची आघाडीची फळी म्हणून जाधव गट,नगरसेवक अप्पा माने, अतुल शिंदे, गुजर, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, यांच्यासह अनेक आजी - माजी नगरसेवक तसेच शहरातील नवं-नवीन कार्यकर्ते या लढतीसाठी अग्रेसर असतील असे सांगितले जाते.झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार प्रिथ्वीराजबाबाना शहरातून विजयी लीड द्यायला जाधव गटाचे विशेष प्रयत्न कारणीभूत असल्याची आजही चर्चा असते. शहरात आपल्या असणाऱ्या गटाच्या माध्यमातून त्यांनी पेठे - पेठेत कार्यकर्त्यांना व अनुयायांना बाबांच्या पाठीशी उभे करून मतदानातून शहरातील निर्णायक विजयी कौल देण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याचे सर्वश्रुत आहे. यावर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीकरिता पृथ्वीराजबाबा यांचे नेतृत्व मानणारे पॅनल महाविकास आघाडीत सहभागी असणार आहे... आणि त्यामध्ये जाधव गटाकडे महत्वाची जबाबदारी असेल... असेही हमखास वृत्त आहे.
No comments:
Post a Comment