Sunday, March 7, 2021

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश...

कोलकाता- ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण मिथून चक्रवर्ती यांनी आज भाजपचे कमळ हाती घेतले. पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती. या सभेपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी मिथून चक्रवर्ती यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपात जाणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जोरदार प्रचार सुरू आहे. आठ टप्प्यात मतदान होणार असून, उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली जात आहे. त्यामुळे आता बंगालमध्ये प्रचाराचा पारा वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (०७ मार्च) पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून, ते कोलकातामध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहे. याचदरम्यान अभिनेते मिथून चक्रवर्ती त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. हे वृत्त खरं ठरलं आहे. मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पक्षात प्रवेश केला.

No comments:

Post a Comment