शहरात कोरोनाचे रूग्ण आढळू लागल्याने जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी शुक्रवारी पालिकेत नागरी आरोग्य केंद्र व पालिकेकडून कोविड प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱया उपाययोजनांचा आढावा घेत सूचना केल्या.
आरोग्य सभपती विजय वाटेगावकर यांनी शुक्रवारी पालिकेत कोरोना विषयक आढवा बैठकीचे आयोजन केले होते. गट नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य विभागाचे प्रमुख रफीक भालदार, नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शहरात 22 रूग्ण शुक्रवारअखेर ऍक्टिव्ह आहेत. जानेवारी महिन्यापासून शहरात हळूहळू रूग्ण सापडू लागले आहेत. त्यापूर्वी पालिकेच्या उपाययोजनांनी संसर्ग मंदावलेला होता. मात्र आता अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरू आहेत. बाजारपेठेत गर्दीही होत आहे. त्यातच जिल्हय़ासह राज्यात संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरात टेस्टींगचे प्रमाण पुन्हा वाढवावे, त्यासाठी नागरी आरोग्य केंद्रास आवश्यक ते मनुष्यबळ पुरवले जाईल. रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट टेसिंगवर भर द्यावा. मास्क, सोशल डिस्टन्सबाबत कारवाईवर भर द्यावा, असे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग शहरात वाढू न देण्यासाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी लवकरच शहरातील डॉक्टर्स, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील, असे यादव यांनी सांगितले. डॉ. शीतल कुलकर्णी यांनी शहरातील कोविड रूग्णसंख्येचा आढावा सादर केला. सद्यस्थितीत शहरात 22 रूग्ण सक्रीय असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय वाटेगावकर यांनी यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त यांचे लसीकरण वेगाने होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.
No comments:
Post a Comment