Monday, March 22, 2021

लॉक डाऊनबाबत दोन दिवसांत निर्णय... ना राजेश टोपे यांचे मोठे विधान...


राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्येत सातत्याने वाढत गेली, तर काही शहरांमध्ये लॉकडाउन लावण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच दोन दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
       
याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढणे, ही चिंतेची बाब आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि लॉकडाउन लावायचा का, लावला तर कुठे लावायचा, याबाबत निर्णय घेतला जाईल. पण, घाबरण्याचे कारण नाही, लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही. पण, यातही लॉकडाऊन टाळायचा असेल तर जनतेने नियमांचे पालन करायला हवे, असे आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment