कराड
कोरोनाचा वाढता कहर पाहता शिरवळ शहराला प्रतिबंधक शहर म्हणून आज प्रांताधिकारी यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे शिरवळमध्ये आजपासून लॉक डाऊन पडला आहे त्याठिकाणी अत्यावश्यक सेवा घरपोच पद्धतीने दिल्या जाणार आहेत.
शिरवळ शहराच्या प्रतिबंधक क्षेत्राच्या सर्व बाजू पुढील आदेश येईतोपर्यंत सीलबंद करण्यात आल्या आहेत प्रतिबंध क्षेत्रातील सर्व आस्थापना दुकाने व व्यवसाय बंद राहणार आहेत अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध औषधे भाजीपाला खते किरणामाल इत्यादी सेवा घरपोच पद्धतीने चालू राहणार आहेत ज्या परिसरात रुग्ण आढळला आहे तिथे कोणीही वैद्यकीय कारणा शिवाय बाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेतली आहे रुग्णाच्या सहवासातील लोकांची यादी करून प्रतिबंधक क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करून घेण्याबाबत आदेश देण्यात आलेत
दरम्यान शहरात लॉक डाऊन पडणार कळल्यावर लोकांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती
No comments:
Post a Comment