Thursday, May 12, 2022

लोकशाही आघाडीकडून खासदारांचे आभार - शहरासाठी राज्य शासनाकडून दिला 85 लाखांचा निधी

वेध माझा ऑनलाइन - लोकशाही आघाडीने सुचवलेल्या कराड शहरातील विविध विकासकामे व रस्त्यांसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून सुमारे 85 लाख रूपयांचा निधी मिळवून दिला आहे. याबाबतचा शासन आदेश प्रसिद्ध झाला असून शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. 

याबद्दल आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. राष्ट्रवादीचे आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, माजी नगरसेवक मोहसीन आंबेकर, जयंत बेडेकर, शिवाजी पवार, अख्तर आंबेकरी उपस्थित होते.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी शहरातील विकासकामांबाबत प्रस्ताव देण्याची सूचना लोकशाही आघाडीला केली होती. त्यानुसार आघाडीने सोमवार पेठ, रूक्मिणी नगर, वाखाण परिसर, बैलबाजार परिसरातील विविध कामांचे प्रस्ताव दिले होते. एप्रिल महिन्यात नगरविकास विभागाने वैशिष्टय़पूर्ण कामांसाठी अनुदानांतर्गत  दोन कामांसाठी 36 लाख 20 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात सोमवार पेठेतील काळे वाडा परिसरातील सि. स. नंबर 70 मध्ये मंजूर शहर विकास योजनेतील मोकळय़ा जागेत पार्किंग व त्यावर अभ्यासिका बांधण्यासाठी 20 लाख रूपये मंजूर झाले आहेत. तर वाखाण भागातील रूक्मिणी गार्डन भाग 1 च्या  ओपन स्पेसमध्ये ओपन जिम व गार्डन विकसित करणे या कामासाठी 16 लाख 20 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तर विविध रस्त्यांसाठी 48 लाख 20 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात रूक्मिणी गार्डनमधील पोतदार घर ते सराटे घर रस्ता काँक्रिटीकरण, निलेश सूर्यवंशी घर ते औधे घर रस्ता काँक्रिटीकरण, रूक्मिणी पार्कमध्ये उदय यंदे ते कच्छी घर रस्ता काँक्रिटीकरण, अशोक विहारमध्ये बेलवणकर ते साळुंखे घर रस्ता काँक्रिटीकरण, बादल घर ते साळुंखे घर रस्ता काँक्रिटीकरण, रूक्मिणीनगरमध्ये लाड यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे या सर्व कामांसाठी 13 लाख 80 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. वाखाण रोडवर केशर संकुल ते दक्षिणेस कलबुर्गी यांच्या घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण व वाखाण रस्त्यावर शहा यांची इमारत ते दक्षिणेस आरब यांच्या बंगल्यापर्यंतच्या रस्त्यावर बंदिस्त आरसीसी गटर्स लाईन टाकणे या कामासाठी 15 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच बैलबाजार परिसरातील लक्ष्मी नारायण चौक ते पूर्वेस राजू शिंदे यांच्या ऑफिसपर्यंत आरसीसी गटर्स, लक्ष्मी नारायण चौकापासून रघुनाथ कदम बंगल्यापर्यंत आरसीसी गटर्स बांधणे या कामांसाठी 20 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.  
खासदार श्रीनिवास पाटील यांनी या कामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याबद्दल लोकशाही आघाडीने त्यांचे आभार मानले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सौरभ पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment