वेध माझा ऑनलाइन - येथील शंभूतीर्थावर उभारण्यात येणाऱया स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या उभारणीत लोकसहभाग वाढावा, या हेतुने शंभूतीर्थ संवाद यात्रेचा शुभारंभ झाला आहे. या माध्यमातून कराड तालुक्यातील गावोगाव या भव्य स्मारकाची माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबर स्मारक निधी संकलन सुरू करण्यात आले आहे.
येथील शंभूतीर्थावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक राज्यातील भव्य स्मारक ठरणार असून एकूण सात कोटी रूपयांचा हा प्रकल्प आहे. या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा, संग्रहालय, स्पर्धा परीक्षार्थींसाठी अभ्यासिका व ग्रंथालय असणार आहे. स्मारक उभारणीसह समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजा स्मारक समिती कार्यरत आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी कराड शहरासह संपूर्ण तालुक्यातील गावांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत नुकताच छत्रपती संभाजी महाराजा जयंती सोहळा थाटात साजरा करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील गावोगावच्या शिवशंभूप्रेमींना या स्मारकाची माहिती व्हावी, यासाठी समितीच्या वतीने शंभूतीर्थ संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक गावात जाऊन समितीतर्फे नियोजित स्मारकाची माहिती दिली जात आहे. तसेच हे स्मारक लोकसहभागातून उभारण्यात येणार असल्याने निधी संकलनासही हातभार लावावा, असे आवाहन करण्यात येत आहे. आतापर्यंत मालखेड, बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, कालवडे, टेंभू, कोरेगाव, कार्वे आदी गावांमध्ये बैठका झाल्या आहेत. गावोगावाचे ग्रामस्थ आणि शिवशंभूप्रेमी तरूणांनी या स्मारकाच्या उभारणीत सक्रीय योगदान देण्याची ग्वाही दिली आहे. कराड शहरालगतच्या गावांमध्ये पहिल्या टप्प्यात बैठका घेण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत.
स्मारक समितीच्या वतीने या कार्यात व्यापक लोकसहभाग वाढवण्यासाठी क्रियाशील सदस्य व मार्गदर्शक समितीची निवड करण्यात येणार आहे. या समित्यांत काम करण्यासाठी इच्छुक असणारांनी रणजितनाना पाटील (9922750444), प्रताप इंगवले (8830208029), जॉन्टी थोरात ( 9822684533), सुनील शिंदे (7798691999), ओमकार पलंगे (9922637773)
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment