Friday, May 6, 2022

एल. आय. सी. ऑफिसला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक...

वेध माझा ऑनलाइन - मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयाला भीषण आग लागली आहे. एलआयसीच्या कार्यालयाच्या संपूर्ण मजल्यावर आग पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

आग लागली त्यावेळी इमारतीत जास्त कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पण आगीत अनेक महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment