Thursday, May 5, 2022

अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज ठाकरेंना इशारा

वेध माझा ऑनलाइन - अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, असा इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिला आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंनी राज्य सरकारला 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यात काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण केलं. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही केली. पण काल राज्यभरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

राज्य कायद्याने चालते. नियम सर्वांना बंधनकारक आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेण्याचे कुणी धाडस केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. राज्यातील सामाजिक सलोखा न बिघडवण्याचं आवाहन विरोधकांना यावेळी अजित पवार यांनी केलं आहे. राज्यात काल घडलेल्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.
कुणीही उग्र आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच, असा इशाराच उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला आहे. राज्यातील पोलीस यासाठी सक्षम असल्याही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment