वेध माझा ऑनलाइन - उष्णतेनं हैराण झालेल्या देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे. येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.
केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
|
No comments:
Post a Comment