Saturday, May 7, 2022

नामदार बाळासाहेब पाटील,आमदार पृथ्वीराज चव्हाण,खा श्रीनिवास पाटील याना शिवजयंती मिरवणुकीसाठी आमंत्रित केले होते... हिंदू एकता आंदोलनाचे स्पष्टीकरण...

वेध माझा ऑनलाइन - दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील शिवजयंतीनिमित्त शहरातून मोठी दरबार मिरवणूक पार पडली या मिरवणुकीतून भाजप नेते आ. आशिष शेलार याना आमंत्रित करण्यात आल्याबद्दल येथील काही  शिवसैनिकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती त्याला कराड शहर हिंदू एकता आंदोलनाचे शहर अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी निवेदनाद्वारे उत्तर दिले आहे

निवेदनात प्रकाश जाधव म्हणतात, गेली 51 वर्षांपासून शहरातून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असते यावर्षी देखील शिवमहोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळची मिरवणूक ऐतिहासिक ठरली यावेळच्या महोत्सवातून अनेक कार्यक्रम पार पडले त्यामुळे शहरात भगवे वादळ निर्माण झाले

दरवर्षीच आपण शहर व इतर परिसरातील राजकीय मान्यवरांना शहरातील शिवजयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीतून सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत असतो याहीवेळी आपण माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण नामदार पालकमंत्री बाळासाहेब पाटील भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ आशिष शेलार कोरेगावचे आमदार महेश शिंदे खासदार श्रीनिवास पाटील डॉ अतुलबाबा भोसले ऍड उदयदादा पाटील या सर्व मान्यवरांना आमंत्रित केले होते त्यापैकी आ आशिष शेलार कराडच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहिलेले दिसले  

यावर्षी रेकॉर्डब्रेक हिंदू समाज एकत्र आला शहरातून भगवी सुनामी निर्माण झाली त्यामुळे येथील काहींच्या पोटात अचानक पोटशूळ निर्माण झाल्याने हे लोक याबाबतची चुकीची माहिती देत स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी लोकांची दिशाभूल करत आहेत असेही या निवेदनात म्हटले आहे

No comments:

Post a Comment