Wednesday, May 11, 2022

कराड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा...


वेध माझा ऑनलाइन - 
लोकशाही आघाडीचे मार्गदर्शक आणि कराड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमधील रेव्हिन्यू कॉलनीमध्ये विक्रमसिंह देशमुख आणि अभयकुमार देशमुख मित्रपरिवाराच्या वतीने अंगणवाडी केंद्र क्रमांक ११५ मधील तीस विद्यार्थांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. 


कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कांबळे, लोकशाही आघाडीचे नेते आणि कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी, भाऊसाहेब शिंदे, शिवाजी पवार, पोपटराव साळुंखे, मंगेश वास्के, जयप्रकाश रसाळ, अमित शिंदे, विठ्ठलराव देशमुख, अमोल पवार, रणजीत शिंदे, शंकर दळवी, मनोज यादव, प्रशांत भोसले,  पत्रकार अमोल टकले, पत्रकार सुहास कांबळे, पत्रकार सकलेन मुलानी, सारीका देशमुख, स्वप्नाली शिंदे, अंगणवाडी शिक्षिका मीना काटवटे, वंदना पाटसुपे, वंदना रणदिवे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी सुभाष पाटील यांचा वाढदिवस अशा अनोख्या पध्दतीने साजरा केला जातोय याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच परिसरातील शाळांना जी कोणती मदत लागेल तिथे लोकशाही आघाडी सर्वातोपरी मदत करेल असं आश्वासनही त्यांनी बोलताना यावेळी दिले असे उपक्रम आपण आघाडीच्या माध्यमातून एकत्र राबवू असेही त्यांनी सांगितले
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनीदेखील सुभाशकाका यांच्या साजरा झालेल्या वाढदिवसाच्या अनोख्या सादरीकरणाचे कौतुक केले

No comments:

Post a Comment