Tuesday, May 3, 2022

अखेर औरंगाबाद सभेप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल ; राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ...!

वेध माझा ऑनलाइन - औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झालीये. मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय दंड विधानातील कलम 116, 117, 153 अ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 135 नुसार हा गुन्हा दाखल आलाय.

राज ठाकरे यांनी १ मेरोजी औरंगाबादेत सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यावरुन टीकेची झोड उठवली होती. या भाषणाप्रकरणी राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ झालीये. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आलाय. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन केल्याचं एफआयआरमध्ये म्हटले आहे. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं समोर आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास सरकारनेही संघर्षाची तयारी ठेवावी, असं मनसेच्या संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.

No comments:

Post a Comment