वेध माझा ऑनलाइन - उद्या सर्वत्र साजऱ्या होणार्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका काहीशी नरमाईची घेत आपल्या तमाम मनसैनिकांसाठी ट्युट करुन माहिती दिली आहे. राज्यभरात उद्या होणाऱ्या महाआरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
यासंबंधी मनसेकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून राज ठाकरे यांनी याबद्दल एक ट्विटही शेअर केला आहे. 'कोणीही उद्या महाआरती करू नका, पुढे काय करायचं ते मी सांगतो', अशा शब्दात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राज यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की उद्या ईद आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे मी उद्या आपल्यासमोर मांडेन असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment