वेध माझा ऑनलाइन - जागतिक परिचारीका दिनाच्या निमित्ताने मनसेच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयातील परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या व ज्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी जागतीक परिचारीका दिन साजरा करण्यात येतो त्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची प्रतिमा उपजिल्हा रूग्णालयाला भेट देण्यात आली.
यावेळी मनसेच शहर अध्यक्ष सागर बर्गे, पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर, नितिन महाडिक, प्रवीण गायकवाड, भानूदास वास्के, संभाजी चव्हाण, संभाजी सकट, संदीप हावरे, प्रशांत गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रकाश शिंदे व परीचारीका उपस्थीत होत्या.
यावेळी बोलताना सागर बर्गे म्हणाले की, 1854 मध्ये ब्रिटिश आणि रशियन मध्ये क्रिमियाचे युद्ध झाले. त्यावेळी त्या युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी अतिशय बिकट परिस्थितीत सेवा केली. रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन त्या युद्धभूमीवर जाऊन रुग्णांची विचारपूस करत असत. त्यामुळे सैनिक प्रेम आणि आदरने त्यांना 'लेडी विथ लॅम्प असे म्हणत.म्हणुन त्यांच्या जन्म दिनी जागीतक परिचारीका दिन साजरा करण्यात यतो. परिचारिका काम करताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावत असतात. त्यांनी कोविड काळामध्ये अतिशय उल्लेखनीय सेवा केली आहे, त्यांचा सत्कार म्हणजे मानवतेचा सत्कार आहे. असे मत सागर बर्गे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुढील वर्षीपासून आदर्श परिचारिका पुरस्कार देण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment