Wednesday, May 4, 2022

नगरपालिका निवडणुकीचा मार्ग झाला मोकळा ; रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा ; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश...

वेध माझा ऑनलाइन - ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. पण आजच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीत कोर्टानं दोन आठवड्यात महाराष्ट्रातील रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करा असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. 
तसेच तत्काळ या निवडणुका घेण्यात याव्यात असंही कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं राज्यातील रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

पालिका निवडणूका कधी होणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या मात्र ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणूक होणार नाही हे  देखील स्पष्टच होते  याबाबतच्या काही निर्णय जाहीर होण्याबाबतच्या तारखा देखील पुढे पुढे ढकलल्या गेल्या मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसाच राहिला  केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना दोष देत इम्पिरीअल डेटा च्या नावावर एकमेकांवर आरोप देखील केले होते
आज सुप्रीम कोर्टाने या संपूर्ण चर्चेला पूर्ण विराम देत निवडणुका ओबीसी अरक्षणाशिवाय घ्या दोन आठवड्यात या निवडणुकीचा कार्यक्रम लावा असे आदेश देऊन टाकले त्यामुळे आता या  निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय

No comments:

Post a Comment