वेध माझा ऑनलाइन - मशिदींवरील भोंग्यांवरुन वातावरण तापलेलं असतानाच एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. आज औरंगजेबच्या कबरीजवळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अखेरीस पर्यटकांसाठी कबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबाद जवळील खुलताबाद येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही लोक औरंगजेबच्या कबरीवर चाल करून जाणार अशी अफवा पसरली होती. त्यामुळे लगेच कबरीचे मुख्य दार बंद करण्यात आले. अफवा नागरिकांच्या कानावर पडताच स्थानिक नागरिकही जमायला सुरुवात झाली होती.
याची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ औरंगजेबच्या कबरीकडे धाव घेतली. पोलिसांनी काही झाले नाही, काही होणार नाही, असे समजावत नागरिकांना तिथून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आता कबरीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मध्यंतरी, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी औरंगजेबच्या कबरीवर गेले होते. ओवैसींच्या कबरीवर जाण्यामुळे राजकीय वाद पेटला होता. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यावर आक्षेप घेतला होता. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे" याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!"
नितेश राणे यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं, "मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!" पोलिसांना बाजूला करा म्हणत नितेश राणे यांनी थेट आव्हानच दिलं होतं.
No comments:
Post a Comment