वेध माझा ऑनलाइन - येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती शनिवार 14 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त शिवतीर्थ परिसरात पताका, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
उद्या शनिवारी 14 रोजी सकाळी 8.30 वाजता शिवतीर्थावर गुढी उभारण्यात येणार आहे. तर 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी किल्ले पुरंदरवरून आणलेल्या ज्योतचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 5 वाजता 365 माता-भगिनींची पारंपरिक वेशात रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शंभूतीर्थावर आल्यानंतर शंभूजन्माचा पाळणा होणार आहे. त्यानंतर व्याख्याते प्रा. अरूण घोडके (इस्लामपूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
जयंतीसाठी शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. साईट व्ही या जागेला पताका, झालर व रोषणाई करण्यात आली आहे. या परिसरातील सर्व रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. शिवतीर्थावर आकर्षक सजावट करण्यात आली असून तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तर सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम याचठिकाणी होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई हे या सोहळय़ाचे वैशिष्टय़ असणार आहे.
शिव-शंभूप्रेमींनी शहरात प्रथमच भव्य स्वरूपात होणाऱया या जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था
जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील शिव-शंभूप्रेमी मोठय़ा संख्येने येणार असल्याने चार चाकी व दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था रत्नागिरी गोडावून, बैलबाजार रस्ता, छत्रपती संभाजी भाजी मार्केट या ठिकाणी करण्यात आली आहे. साईट व्ही लगतच्या रस्त्यांवर कोणीही वाहने लावू नयेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment