Tuesday, May 10, 2022

घराबाहेर झोपलेल्या तरुणाची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या ; सातारा जिल्ह्यातील घटना ; जिल्ह्यात एकच खळबळ...

वेध माझा ऑनलाइन - साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घराबाहेर झोपलेल्या तरुणाची धारदार शस्त्रानं गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत केवळ 30 वर्षांचा होता.

साताऱ्यातील फलटण तालुका येथील पाडेगावच्या हद्दीतील शिवचा मळा येथे ही घटना घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राहुल नारायण मोहिते असं आहे. मृत राहुल हा ट्रक ड्रायव्हर होता.
राहुलच्या गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्या झाल्याचं समजताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सध्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा सुरु केला असून अधिक तपास सुरु आहे. राहुलची हत्या कोणत्या कारणासाठी झाली हे मात्र समजू शकले नसून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत

No comments:

Post a Comment