वेध माझा ऑनलाइन - रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांहून जास्त काळ युद्ध सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुतीन यांची तब्बेत बिघडल्याचं सांगितलं जातंय. त्यातच पुतीन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला असू शकतो असा दावा हा ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे.
हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार...
पुतीन यांचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर आली तर एकच खळबळ उडण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळेच त्यांच्यासारखाच दिसणारा, देहबोली असणाऱ्या व्यक्तीकडून राज्यकारभार चालवला जात असल्याचा दावा MI6 च्या प्रमुखांनी केला आहे. याबाबत ब्रिटनच्या मिरर संकेतस्थळाने 'द डेली स्टार'च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कॅन्सर असल्याचं मध्यंतरी सांगितलं जात होतं. त्यावरील उपचारासाठी ऐन युद्धाच्या काळात पुतीन हे सुट्टीवर जाणार होते. पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पुतीन त्यांच्या अनुपस्थितीत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि एफएसबी या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख निको हे सांभाळणार असल्याचे वृत्त होते
No comments:
Post a Comment