Monday, May 2, 2022

आरेवाडी, विकास सोसायटीत सत्ताधारी भैरवनाथ पॅनेल विजयी

वेध माझा ऑनलाइन -  आरेवाडी, ता. कराड येथील जय किसान विकास सेवा सोसायटीच्या
पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच स्व. गोविंदराव चव्हाण यांच्या समर्थकांच्या सत्ताधारी भैरवनाथ रयत विकास पॅनेल मोठ्या फरकाने विजयी झाले. या पॅनेलने निवडणूक झालेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवर  विजय प्राप्त केला.

स्व. गोविंदराव चव्हाण, स्व. आबासाहेब देसाई (गुरुजी), स्व. प्राचार्य उत्तमराव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या विकास
सोसायटीच्या निवडणुकीत सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत भाग्यलक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन प्रा. अशोक चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक लक्ष्मण देसाई, माजी चेअरमन जगन्नाथ देसाई,
भैरवनाथ दूध संघाचे चेअरमन दिलीप देसाई, हणमंत यादव (सर), माजी उपसरपंच
शिवाजी यादव, उपसरपंच अविनाश देसाई, विठ्ठलराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने निवडणूक लढवली होती.

`या निवडणुकीत भैरवनाथ पॅनेलचे विलास देसाई (148), संजय ढगाले (145),
मधुकर यादव (145), प्रल्हाद देसाई (144), रमेश कणसे (139), संपत चव्हाण
(139), रघुनाथ बाबर (136), संजय यादव (136), बेबीताई देसाई (148), सुमन
यादव (146) मते घेऊन विजयी झाले. तर पॅनेलचे निजाम मुल्ला बिनविरोध निवडून आले.
 
उपसरपंच अशोक यादव, दादासाहेब यादव, सागर देसाई, अनिकेत देसाई,
प्रवीण चव्हाण, जयवंत चव्हाण, भरत शेजवळ, दीपक जाधव, दादासाहेब गोंजारी व
कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारात परिश्रम घेतले.


--

No comments:

Post a Comment