वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची उद्या होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
कोविडच्या डेड सेल्स सापडल्या, पण हा कोरोना नाही
बुधवारी राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी ते मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या विविध वैद्यकीच तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत.
राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment