वेध माझा ऑनलाइन - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी 'भीमा कोरोगाव हिंसाचाराला भाजप सरकार जबाबदार होतं. हिंसा नियंत्रण करता आले असते पण तसे केले गेले नाही' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब चौकशी समितीने नोंदवला आहे. यावेळी शरद पवार यांनी स्पष्टपणे फडणवीस सरकारवर आरोप केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचाराला भाजप सरकार जबाबदार होतं. हिंसा नियंत्रण करता आले असते पण तसे केले गेले नाही. राजकीय शक्तीचा अभावामुळे हिंसाचार झाला. भाजप सरकारने वेळीच उपाययोजना केली नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार यांना चौकशी समितीने विचारलेले प्रश्न जसेच्या तसे...
किरण चन्ने- Right विंग याची परिभाषा काय आहे?
शरद पवार -धर्म जात समाजातील ऐक्य आहे, बाधित करण्याचा काम काही लोक करत आहे. चुकीचे साहित्याला समाजात बंदी घालण्याची गरज आहे. देशात दोन विचार धारा आहे. धर्म जातीचा विषय करून जाणीवपूर्वक विघटनवादी प्रयत्न केला जात आहे.
किरण चन्ने-सरकारने अॅक्शन प्लॅनमध्ये कमी पडली आहे काय?
शरद पवार-जे काही घडले ते दुर्दैवी घडले असे बोलले आहे. या घटनेला त्यावेळीची सरकार जबाबदार आहे.
किरण चन्ने -31 डिसेंबरची एल्गार परिषद यांचे आयोजक रमेश गायचोर, सागर गोरखे, सुधीर ढवळे याबद्दल आपल्या माहिती होती काय. यांनी माओवादी ट्रेनिंग comp मध्ये सहभाग घेतला होता.?
शरद पवार-मला याबद्दल माहिती नाही.
किरण चन्ने - भीमा कोरोगावची हिसांची सुरुवात वळू बुद्रुक मधील झाली काय?
शरद पवार-काही लोक वेगळे विचाराचे वेगळे वातावरण तयार करण्याच्या तयारीत होते. उजव्या विचारधारेचे लोक वेगळे काही करण्याच्या तयारीत होते असे माझ्या कानावर आले होते.
किरण चन्ने -एल्गार परिषदेचे आयोजनात वळू बुद्रुकमध्ये फ्लॅग लावणारा व्यक्ती किरण शिंदे हाच होता याबद्दल आपल्याला माहिती आहे काय?
शरद पवार-मला याबद्दल माहीत नाही.
No comments:
Post a Comment