वेध माझा ऑनलाइन - राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. श्रीमंत शाहू महाराजांनी छत्रपती संभाजीराजेंवर टीका करत शिवसेनेची बाजू घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली तर त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यादरम्यान आता आणखी एका भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. संभाजीराजे छत्रपती आणि आणि शिवेंद्रसिंहराजे यांची साताऱ्यात भेट झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी येथे ही धावती भेट झाली. यामुळे भविष्यात दोन्ही राजे एकत्र येऊन राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही राजेंच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंचा गेम केला असल्याचं वक्तव्य आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केलं होतं. यावर संजय राऊत आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्युत्तर देत आगीत तेल ओतू नये अशी टीका केली होती.
No comments:
Post a Comment