Sunday, May 8, 2022

शाहू चौक मित्र परिवाराच्यावतीने वाजीदभाई मुल्ला यांचा वाढदिवस साजरा ;

वेध माझा ऑनलाइन - येथील शाहू चौक मित्र परिवारातील सर्वांचे लाडके बंधुतुल्य मित्र वाजीद भाई मुल्ला यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात पार पडला वाढदिवसाच्या निमित्ताने    त्यांनी आज येथील शाहू चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला तसेच दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल
वाजीद मुल्ला हे शाहू चौक मित्रपरिवाराच्या माध्यमातुन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर दिसतात ते स्वतः उद्योजक आहेत त्यातूनही ते समाज कार्यासाठी वेळ काढून आपली समाजाप्रती असणारी बांधिलकी जपताना दिसतात... 
शहरात  शाहू चौक मित्र परिवार नेहमीच गरजु लोकांना मदतीसाठी अग्रेसर असतो या ग्रुपने कोविड काळात मोठं काम केले आहे मधल्या काळात झालेल्या पावसाने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असताना लोकांना सर्वतोपरी मदतीचा हात या ग्रुपने दिला आहे 
नुकतेच एका चिमुकल्या लहान बाळाचा हात उकळत्या दुधाने भाजल्याने त्या बाळाची परिस्थिती गँभिर झाली असताना या मित्रपरिवाराने त्या बाळाला कराड, सांगली अशा ठिकाणी नेऊन वैद्यकीय उपचार देण्यासाठी दिवसरात्र धडपड केली आणि त्यातून या ग्रुपचे संवेदनशील अंतःकरणाने चालू असणारे निस्वार्थी समाजकार्य संपूर्ण शहराला दिसले... या कार्यात सर्व ग्रुप सदस्यांसह वाजीदभाई देखील अग्रेसर असल्याचे पहायला मिळाले... त्यांनी या मित्र परिवाराच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच आपल्या कार्याला समाजाभिमुख ठेवले आहे... 
त्यांचा आज वाढदिवस शाहू चौक येथे सर्व मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहर व परिसरातून अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment