डॉ भोसले पुढे म्हणाले...पूर्वीची पत्रकारिता आणि वाचक हे दोन्ही घटक सजग होते त्यावेळच्या संपादकांचा दबदबा होता त्यांची आदरयुक्त भीती वाटायची सध्या संपादकांचे त्यांचा शिपायी ऐकत नाही अशी परिस्थिती आहे तरी हे लोक संपादक म्हणून समाजात फिरतात
पत्रकारिता करणाऱ्याला अनेक विषय खुणावत असतात फक्त आपले त्याकडे लक्ष असणे गरजेचे असते शैक्षणिक धोरणे क्रीडा राजकारण आर्थिक धोरणातील त्रुटी, शेतकरी धोरणात आवश्यक ते बदल करण्याची निर्माण झालेली गरज यासह अनेकविध सामाजिक असे विषय आहेत की ज्यांच्याबद्दल लिहिणे व त्यातून सामाजिक आमूलाग्र सकारात्मक व समाजोपयोगी बदल घडवून आणणे पत्रकारांच्या प्रयत्नाने शक्य आहे या सर्वच विषयामध्ये अनेक विषयात चांगले वाईट निष्कर्ष आढळून येतात त्याचे विश्लेषण करणेही पत्रकारांचे काम आहे समाज विकसित करून अनेक अर्थानी तो प्रगल्भ होईल त्यासाठीही पत्रकारांचे प्रयत्न हवेत
पत्रकारिता करणार्यांना आता लोकल बातम्यासह देश विदेशातील अनेक विषयांवर लिखाण व विश्लेषण करता येणे गरजेचे बनले आहे तरच तो पत्रकार म्हणून टिकू शकेल असेही ते म्हणाले
बदलत्या ग्लोबल पत्रकारितेबाबत बोलताना ते म्हणाले सध्या कोणतीही जगातील घटना आपण काही क्षणात आपल्या मोबाईलवर यु ट्यूब व पोर्टल किंवा तत्सम माध्यमातून पाहू शकतो त्यासाठी दुसऱ्या दिवशी ती बातमी वर्तमानपत्रातून आल्यानंतर वाचण्याची वाट पहावी लागत नाही रात्रीपर्यंत आपलयाला दिवसातील सगळ्या बातम्या अवगत झालेल्या असतात हे या बदलत्या पत्रकारितेचे यश आहे
प्राचार्य राजमाने यांनी आपल्या मनोगतात एमजीएम महाविद्यालयात नेहमीच पत्रकारांचा सन्मान केला जातो यापुढेही ही परंपरा चालू राहील असे आश्वासन दिले
सदर कार्यक्रमास कराड शहर व परिसरातील पत्रकार उपस्थित होते
No comments:
Post a Comment