Saturday, January 27, 2024

मोठी बातमी! मराठा समाजाकडे जमीन किती? मागासवर्ग आयोगाने मागविली माहिती ;

वेध माझा ऑनलाइन। राज्य सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.राज्य सरकारने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक मागासले पण तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील मराठा समाज, खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण घरोघरी जाऊन सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समांतर पातळीवर राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला पत्र पाठवून मराठा समाजातील नागरिकांच्या जमिनींची माहिती मागविली आहे. मराठा समाजातील नागरिकांकडे किती जमीन आहे याबाबतची १९६० ते २०२० या कालावधीतील माहिती मागविण्यात आली आहे. त्याकरिता आयोगाने एक नमुना तयार केला आहे एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये, शेतकरी संख्या आणि मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या यांचा समावेश असलेली माहिती मागविली आहे. त्या नमुन्यानुसार ही माहिती महसूल विभागाकडून प्राप्त करून देण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाकडे केलेली आहे.

No comments:

Post a Comment