वेध माझा ऑनलाइन। आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान चा सन 2024 चा 'कराड - गौरव पुरस्कार' शालेय, चित्रकला, स्काऊट गाईड संघटना, विकलांग विद्यार्थ्यांसाठी तसेच नाट्यक्षेत्र, आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य व राज्याच्याबाहेर दिल्लीपर्यंत,आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा ठसा उमटवीत या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या, ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका सौ पुष्पा दिलीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष,राज्याचे माजी सहकार व प्रधानमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्तांच्या सभेमध्ये करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यावेळी, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, एडवोकेट मानसिंगराव पाटील, राजेंद्र वसंतराव माने, दिलीपभाऊ चव्हाण, डॉ. विजयकुमार साळुंखे, सौ. रेश्मा कोरे,सौ. शोभा पाटील संयोजन समिती सदस्य प्रा. रामभाऊ कणसे, ए. एन. मुल्ला, मुकुंदराव कुलकर्णी, संभाजी पाटील, प्रकाश पवार, अबूबकर सुतार व सुहेल बारस्कर यांची उपस्थिती होती.
प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून (सन 1995 पासून), विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या जवळपास 80 मान्यवरांचा 'कराड - गौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.सन 2024 चा पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना पुढील महिन्यात (फेब्रुवारी) समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे...
No comments:
Post a Comment