Monday, January 1, 2024

जयंत पाटील येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता”, जयंत पाटलांनी छात्तीवर हात ठेवून सांगावे हे खरं की खोट... शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ :

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. येत्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणवार निकाल येणार आहे. याशिवाय राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची चिन्हं आहेत. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. जयंत पाटील लवकरच महायुतीत येतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिरसाटांना टोला लगावला. त्यामुळे संतापलेल्या संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांना थेट छातीवर हात ठेवून खरं सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे.

“जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत, पण मनाने इकडे आहेत. त्यांना महायुतीत यायला जास्त वेळ लागणार नाही. जयंत पाटील येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता”, असा दावा संजय शिरसाट यांनी काल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. मनाने इकडे आणि शरिराने तिकडे असं भासवणारे लोकं इकडेही आहेत. असं चालतच असतं. माणसाने कुणीही विधानं केली तरी त्यांची ही विधानं आहे. उलट तुम्ही त्यांनाच अधिक खोलात विचारा. मला जी माहिती नाही ही त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की हे खरं की खोटं’
जयंत पाटील यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “जयंत पाटील यांना चांगलं माहिती आहे की, संजय शिरसाट खोटं बोलत नाही. मी काही ठाकरे गटाचा खासदार संजय राऊत नाही. मी जे बोलतो ते अधिकृतपणे आणि माहिती असेल तेवढंच बोलतो. म्हणून जयंत पाटील यांनी किती खोटं रेटून बोलल असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की हे खरं की खोटं. याशिवाय वृत्तवाहिन्यांनीदेखील दाखवलं आहे, यामध्ये जयंत पाटील यांनी ते स्वत: कितीदा भेटले, याबाबत खुलासा केला आहे. त्यांना आवश्यकता वाटत असेल तर मी अनेक पुरावे द्यायला तयार आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

No comments:

Post a Comment