वेध माझा ऑनलाइन। रोहित पवारांच्या ईडी चौकशीविरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या पाहायला मिळाल्या. मला प्रश्न पडतो की, जेव्हा अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकशा सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही? तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे वाटले नाही का? असा सवाल अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना ईडीने काल चौकशीसाठी बोलावले असताना राष्ट्रवादीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केली. यामध्ये सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली. यावरून रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट करून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, केवळ अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील, अनिल देशमुख, छगन भुजबळ, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेसदेखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का?
या पोस्टमध्ये रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्याची १०० खोटी कारणे तुम्ही
देत असाल, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हे देखील तितकेच विदारक सत्य आहे असेही त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment