Wednesday, January 17, 2024

संजय राऊत अडकले पाकिस्तानी सोशल मीडियाच्या जाळ्यात! ;

वेध माझा ऑनलाइन। अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला आहे. भारतातच नव्हे तर जगभरात या उत्सवाचा उत्सव दिसत आहे. यावेळी पाकिस्तानकडून अयोध्येतील राम मंदिराबाबत कट रचण्यास सुरुवात झाली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने राम मंदिराविरोधात खोटा प्रचार सुरू केला आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. पाकिस्तानच्या या जाळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अडकले. त्यांनी रामाचे मंदिर अयोध्येत वादग्रस्त जागेवर बांधण्यात आले नसून तिथून पुढे असलेल्या तीन किमी अंतरावर बांधण्यात आल्याचा दावा केला होता. हा दावा पाकिस्तानी सोशल मीडियाचा प्रचार असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी सोशल मीडिया सक्रीय
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राम मंदिरासंदर्भात दावा केला जात आहे. त्यानुसार वादग्रस्त जागेपासून तीन किलोमीटर लांब अंतरावर मंदिर बांधले जात आहे. ही दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याच्या कटात पाकिस्तान असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे यासंदर्भातील एक टूलकिट समोर आले आहे. त्यात ही बातमी पसरवण्यास सांगितले आहे.

पाकिस्तान सोशल मीडियावर राम मंदिराविरोधात नकारात्मक अफवा पसरवल्या जात आहे. तसेच पाकिस्तान सोशल मीडियात अनेक वेगवेगळे हॅशटॅग चालले जात आहेत. त्यात बाबरी मशिदीला पाठिंबा दर्शवला जात आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जाहीर झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी युजर सोशल मीडियावर सक्रिय झाले. त्यांनीच बाबरी मशिदीच्या जागेपासून 3 किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधले आहे, असा प्रचारही चालवला आहे.

No comments:

Post a Comment