वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्याला ठरलेल्या कार्यक्रमानुसार १२ ते १४ तास उशीर झाला आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करत असताना नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे.
मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला
मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग पोलिसांनी बदलला आहे. आंदोलकांना पुणे मुंबई मार्गावर जुन्या घाटातून जाण्याच्या पोलिसांनी सूचना केल्या आहेत. परंतु आंदोलक नवीन मार्गावरुन जाण्याचा भूमिकेवर ठाम आहे.
आझाद मैदानासंदर्भात नोटीस
आझादा मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. आझाद मैदानाची क्षमता पाच हजार आहे. परंतु लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यामुळे आझाद मैदानाच्या क्षमतेची मनोज जरांगे यांना जाणीव करुन द्या, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
No comments:
Post a Comment