वेध माझा ऑनलाइन। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आमने-सामने आले आहेत. “मी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो,” असं विधान बारामती अॅग्रोवर ईडीनं टाकलेल्या धाडीवर रोहित पवारांनी केलं होतं.यावर “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं,” असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना लक्ष्य केलं होतं. आता रोहित पवारांनी ‘एक्स’ अकाउंटवरून बच्चा आहे या विधानावर अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
मी चूक केली असती, तर भारतात आलोच नसतो. दुसरं की खरी चूक केली असती, तर अजित पवारांबरोबर भाजपासोबत गेलो असतो. मात्र, आमच्यासाठी विचार, महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची अस्मिता महत्वाची आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांना सहकार्य करत राहू,” असं रोहित पवारांनी म्हटलं होतं. यावर अजित पवारांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी बच्चा आहे असं म्हटलं होतं.
रोहित पवारांनी ‘एक्स’ अकाउंटवरून अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चे मन के सच्चे है हे गाणं रोहित पवार यांनी शेअर केलंय. तसंच बच्चा है पर मन का सच्चा है. दिल साफ है, नफरत से दूर है असं कॅप्शनही रोहित पवार यांनी दिलं आहे.
अजित पवार म्हणाले होते की, या प्रश्नाला उत्तर द्यावीत, एवढा मोठा झाला नाही”. रोहित पवारांच्या विधानाबद्दल पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं अजित पवारांना विचारलं होतं. त्यावर अजित पवार म्हणाले होते, “बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यावीत, एवढा मोठा झाला नाही. माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते उत्तर देतील.”
No comments:
Post a Comment