वेध माझा ऑनलाइन। सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले तयारीला लागले आहेत त्यांनी नुकतेच कराडच्या एस टी स्टॅण्ड समोरच आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या त्याठिकाणी असलेल्या कार्यालयाजवळच आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.
राजे कराडकडे दुर्लक्ष करतात हा नेहमी आरोप त्यांच्यावर झालेला आहे त्याचा परिणाम देखील प्रत्येक निवडणुकीत कराडकरांनी दाखवून दिल्याने आता या होणाऱ्या निवडणुकीदरम्यान स्वतः कराडात लक्ष घालुन येथील लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी राजे पुढे सरसावले आहेत
उदयनराजेंना गेल्या 2019 च्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघानी मताधिक्य कमी दिले होते. या तीन मतदारसंघांतील मतदारांची नाराजी महाराजांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरली होती. आता याच मतदारसंघातील प्रमुख ठिकाणी असलेल्या कराड शहरातील एस टी स्टॅण्ड समोरच उदयनराजे भोसले यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघाशी थेट संपर्क साधून तेथील मताधिक्य बॅलन्स करण्यासाठी राजेंचा यातून प्रयत्न असणार असे समजते त्यामुळे हे संपर्क कार्यालय आतापासूनच सुरू करण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे हे कार्यालय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयापासून अगदीच जवळ आहे
दरम्यान महायुती'त तिन्ही पक्षात उमेदवारीवरून दावे-प्रतिदावे सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रश्नांवर तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कामावर त्यांच्याकडून लक्ष दिले जात आहे.
No comments:
Post a Comment