Wednesday, January 17, 2024

' कृष्णा 'ने घेतलेल्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, शेतकरी समृद्ध होतील ; ना देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

वेध माझा ऑनलाइन। कृष्णा ने घेतलेल्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटून शेतकरी समृद्ध होण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी कृष्णा  व भोसले कुटुंबाचे योगदान नेहमीच मोठे असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी काढले 

आजपासून कराड येथील शिवाजी स्टेडियम येथे  कृष्णा शेती व औद्योगिक महोत्सव सुरू झाला आहे या महोत्सवाचे उदघाटन ना फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते

यावेळी जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला मोठ्या  संख्येने आवर्जून उपस्थित होत्या

ते पुढे म्हणाले भोसले कुटुंबाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे की कृषी आणि उद्योग हे दोन्ही घटक हातात हात घालून एकत्र काम करू शकतात त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी यशस्वी होतो स्व जयवंतराव भोसले यांनी सहकाराचा जो वृक्ष लावला तो आता वटवृक्ष झाला आहे यासाठी डॉ सुरेश भोसले व डॉ अतुल भोसले यांनी दिलेले त्यासाठीचे आयाम   कारणीभूत आहेत

शेतकरी हा खऱ्या अर्थाने वैज्ञानिक आहे तो मातीतून वेगवगळे प्रयोग करून त्यातून समृद्धी साधण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करताना पाणी आणि  खताचा योग्य वापर करून शेती करणे गरजेचे आहे शेतीला आवश्यक असणारे नवनवीन बदल आत्मसात करणे देखिल शेतकऱ्यांना गरजेचे आहे

ते म्हणाले आमच्या सरकारने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शेती विषयक योजना व त्यासंदर्भातले लाभही देण्याचे काम केले सध्या राज्यभरातील सिचन प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे कृष्णा कोयना परिसरातील प्रकल्प पूर्ण करून या जिल्ह्यात असणाऱ्या माण खटाव चा दुष्काळाचा डाग पुसून टाकणार असल्याचेही फडणवीस म्हणाले जे साखर कारखानदारी नीट चालवू शकले नाहीत त्यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय कारखानदारी व शेतकऱ्यांना मोलाचे ठरले आहे अशी खोचक टिपणीही त्यांनी केली

उदयनराजे म्हणाले फडणवीसांनी राज्यातील कृषी उद्योगाला बळकटी देण्याचे काम यशस्वी केले आहे भविश्यात फडणविसांनी राज्याचा गाडा हाकण्यासाठी कासरा हातात धरून मित्र पक्षांची मोट बांधल्यास राज्यात 48 खासदार निवडून येतील यात शंका नाही डॉ अतुल भोसले यांनी आज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी आणि उद्योग यांचा संगम घडवून आणला आहे सातारा जिल्हा एका पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही सातारा जिल्हा भविष्यात महायुतीला नक्कीच साथ देईल असेही ते म्हणाले

डॉ सुरेश भोसले म्हणाले स्व जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने हा महोत्सव घेण्याचा मानस खूप अगोदर पासून होता आज शासनाच्या सहकार्याने हे प्रदर्शन घेणे शक्य झाले आहे  सध्या जैविक खताची शेतीला गरज आहे शेतीमध्ये संधी फायदा व मार्केट याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी उतरले पाहिजे भाजप च्या काळात शेतीविषयक चांगले निर्णय व शेती उपयुक्त कामे झाल्याचे त्यांनी नमूद केले याच सरकारच्या धोरणांनी साखर कारखानदारी वाचली असेही ते म्हणाले

डॉ अतुल भोसले यांनी, कराड हि शेतकऱ्यांची राजधानी आहे असे सांगून शेतकरी वर्गाच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले तसेच कराडात असलेल्या  स्टेडियम ला उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून याठिकाणी रणजी किंवा इतर मोठे सामने होतील अशी मागणीही त्यांनी यावेळी केली त्याचवेळी फडणवीसांनी अतुल भोसलेंच्या या मागणीला मान्य केल्याचे सांगून टाकले


संजय राऊत यांच्यावर टीका!

यावेळी फडणवीस म्हणाले
अस ऐकलय की या प्रदर्शनात मोठा रेडा आणला आहे म्हणून...आमच्याकडे पण असे काही रेडे आहेत जे रोज सकाळी tv वर येऊन काहीतरी बडबड करत असतात त्यांचा जर बंदोबस्त करता आला तर बरे होईल असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांचा नामोलेख टाळत टीका केली त्यावेळी त्याठिकाणी एकच हशा पिकला

उदयनराजे म्हणाले... मला टीम मध्ये घ्या...

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले कराडचे स्टेडियम झाल्यानंतर जे सामने होतील त्यावेळी टिममध्ये मला पण घ्या, रिझर्व्ह ठेवू नका...
यावर फडणवीस म्हणाले महाराज इथे रणजी नाही तर  20- 20 सामने होणार आहेत त्याचे सगळे नियोजन तुम्हीच बघणार आहात त्यामुळे तुम्हीच आम्हाला टिम मध्ये घ्या म्हणजे झालं... असं म्हणताच त्याठिकाणी पुन्हा हशा पिकला

No comments:

Post a Comment