वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून व डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या विद्यानगर - सैदापूर (ता. कराड) येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते कराड दक्षिण मतदारसंघातील लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आमदार प्रमोद जठार, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, रामकृष्ण वेताळ, श्रीनिवास जाधव, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत मदने, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारिका गावडे, सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव, सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष धनाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ना. मिश्रा म्हणाले, शिक्षणाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख बनविलेल्या विद्यानगरीत येऊन मला अत्यानंद झाला आहे. येत्या काळात या विद्यानगरीत विकासाच्या अनेक संधी निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, विद्यानगरच्या विकासासाठी गेल्या काळात आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले. आत्तासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ना. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून या भागातील रस्त्यासाठी तब्बल ५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. भविष्यातदेखील विद्यानगर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करुन देण्याचे अभिवचन डॉ. भोसले यांनी दिले.
सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव यांनी आपल्या प्रास्तविकात रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्य शासनाचे व डॉ. अतुलबाबांचे आभार मानले. शैक्षणिक हब असलेल्या या परिसरात दररोज जवळपास ४० हजारांहून अधिक विद्यार्थी व त्यांचे पालक प्रवास करतात. अशावेळी या भागातील लोकांच्या सोयीसाठी व विद्यार्थी – पालकांचे हित लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून व डॉ. अतुलबाबांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याचे काम होणार असल्याने, त्याचा लाभ हजारो लोकांना होणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कराड दक्षिण मतदारसंघातील लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. विजय जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुरलीधर जाधव, लहुराज जाधव, विजय जाधव, बाळासाहेब बागडे, प्रशांत देसाई, सीमा घार्गे, शीतल कुलकर्णी, मंजिरी कुलकर्णी, जिजाबा साळुंखे, वसंतराव जाधव, कांतीलाल देसाई यांच्यासह विद्यानगर व सैदापूर परिसरातील स्थानिक नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment