Tuesday, January 30, 2024

शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

वेध माझा ऑनलाइन। शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (वय ७४) यांचे निधन झाले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 

सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. २०१९च्या निवडणूकीत अनिल बाबर यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९०, १९९९, २०१४, २०१९ ला आमदारकीला ते निवडून आले होते.

No comments:

Post a Comment