Thursday, January 25, 2024

“एकदा मराठा आरक्षण मिळू द्या, आपल्याला विरोध करणाऱ्या एक एक नेत्याला…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा


वेध माझा ऑनलाइन। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत यायला निघाले आहेत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरु झाले आहेत. अशात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहेत, ज्यांनी अपमान केला त्यांचा हिशेब चुकता करणार असं म्हटलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.



आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं आहे. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहेत, दिलेला शब्द पाळणारे आहोत हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. आम्ही या भूमिकेवर कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment