लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने महायुतीच्या जागावाटपावर स्पष्ट भाष्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी 22 जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने मागच्यावेळेस 22 जागा लढल्या. त्या 22 जागा या निवडणूकीत आम्हाला हव्या आहेत. पण तिन्ही नेते मिळून निर्णय घेतील. आमचे सध्या 13 खासदार असले तरी आमचे 18 खासदार निवडून आले होते. पण 22 जागा आम्ही लढलो होतो. त्यामुळे आमची मागणी 22 जागांचीच आहे, असं कृपाल तुमाने म्हणालेत.
“तेवढ्या’ जागा अजितदादांना देणं शक्य नाही”
आम्हाला 22 जागा दिल्या. छगन भुजबळ यांच्या मागणीनुसार त्यांना 22 दिल्या. तर मग भाजपवाल्यांनी विचार करावा. पण जेवढ्या जागा आम्हाला तेवढ्या जागा राष्ट्रवादी अजितदादा गटाला देणं शक्य नाही. गेल्यावेळेस आम्ही 18 जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी चार जिंकल्या आणि भाजपने 21 जिंकल्या होत्या. त्यामुळे सिटिंगमध्ये ज्यांनी ज्या जागा जिंकल्या त्यांना त्या मिळतील. त्यापेक्षा जास्त जागा देण्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं तुमाने म्हणाले.
भुजबळांना टोला
आमच्या येवढ्याच जागा राष्ट्रवादीच्या… असं छगन भुजबळ यांना बोलायला काहीच लागत नाही. मी म्हणतो आम्हाला 48 जागा द्या मिळणार आहे का? बोलणं आणि प्रॅक्टिकल देणं, यात फरक आहे. त्यांनाही माहित आहे. त्यांच्याजवळ तरी उमेदवार कुठे आहे? जे निवडून येऊ शकेल त्यांनाच उमेदवारी मिळेल , असा टोलाही कृपाल तुमाने यांनी भुजबळांना लगावला.
No comments:
Post a Comment